2024 Lok Sabha will be impact on stock market; Ahead of the election, the brokerage expressed a forecast  Sakal
Share Market

Share Market: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताय, थोडं थांबा हे वाचा! 2024 च्या लोकसभेचा....

Share Market: देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

राहुल शेळके

Share Market: देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापैकी मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला, मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. या निवडणुकांबाबत राजकीय विश्लेषक आणि आर्थिक सल्लागार वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत.

पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये एकूण लोकसभा आणि राज्यसभेच्या 15 टक्के जागा आहेत. या निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. पुढील वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये लोकसभा निवडणुक होण्याची शक्यता आहे. स्टॉक गुंतवणूकदार या राज्यांतील निवडणुकीच्या निकालांवर लक्ष ठेवून आहेत. असे अँटिक स्टॉक ब्रोकिंगने म्हटले आहे.

"जिथे विजयी मतांचे अंतर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशातील एकूण जागांपैकी 30 टक्के आणि छत्तीसगड आणि तेलंगणामधील 20 टक्के जागा आहेत. या जागांवर जिंकणे अवघड आहे, असे आम्हाला वाटते. तसेच ओपिनियन पोलचे निकालही अगदी जवळ आले आहेत," असे ब्रोकरेजने सांगितले.

2019 मध्ये 10 हिंदी भाषिक राज्यांमध्ये एकूण 225 जागांपैकी भाजपने 79 टक्के किंवा 177 जागा जिंकल्या होत्या. ताज्या ओपिनियन पोलनुसार भाजप यातील काही जागा गमावणार आहे, याचे कारण काँग्रेसने लोकप्रिय योजनांची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पाहता केंद्रातील भाजपा सरकार राज्य पातळीवर कमकुवत असूनही सत्ता टिकवून ठेवण्याची शक्यता आहे. यात I.N.D.I.A युतीचा किमान प्रभाव दिसतो; आणि आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्राकडून लोकप्रिय घोषणा अपेक्षित आहे.

"आमचा विश्वास आहे की  भाजपा पक्ष लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आला नाही, तर भारतातील शेअर मार्केटवर त्याचा वाईट परिणाम होईल. आगामी निवडणुकांसाठी महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांचा परिणाम होऊ शकतो'', असे अँटिक स्टॉक ब्रोकिंगचे मत आहे.

सहा महिन्याचा कालावधी हा राजकीय प्राधान्यक्रम बदलण्यासाठी पुरेसा वेळ आहे. हे 2018/19 च्या निवडणुकीतही दिसून आले होते. त्यामुळे अँटिक स्टॉक ब्रोकिंगने सांगितल्या प्रणाणे 2024 च्या लोकसभेचा खरंच शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT