Bank of Baroda  sakal
Share Market

Bank of Baroda : बडोदा बँकेला ४,८८६ कोटींचा नफा ; प्रतिशेअर ७.६० रुपये लाभांशाची शिफारस

सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदाने मार्च २०२४ अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ४,८८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यातील वाढ केवळ २.३ टक्के आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदाने मार्च २०२४ अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ४,८८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यातील वाढ केवळ २.३ टक्के आहे. जानेवारी-मार्च २०२३ तिमाहीत बँकेने ४,७७५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ३३,७७५ कोटी रुपये झाले असून, मागील वर्षी याच कालावधीत ते २९,३२३ कोटी रुपये होते. बँकेच्या संचालक मंडळाने प्रतिशेअर ७.६० रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे, असे बँकेने म्हटले आहे.

मार्च २०२४ अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत बँकेचे व्याजउत्पन्न मागील तिमाही कालावधीतील २५,८५७ कोटींवरून वाढून २९,५८३ कोटी रुपये झाले आहे. बँकेची एकूण अनुत्पादक मालमत्ता (जीएनपीए) मार्च २०२३ अखेरच्या वर्षातील ३.७९ टक्क्यांवरून २.९२ टक्क्यापर्यंत कमी झाली आहे. निव्वळ ‘एनपीए’देखील २०२३ च्या अखेरीस असलेल्या ०.८९ टक्क्यांवरून ०.६८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. परिणामी, बुडीत कर्जे आणि आकस्मिक अडचणींसाठीच्या तरतुदी मार्च २०२४ तिमाहीत १,३०२ कोटींवर आल्या असून, मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत त्या १४१२ कोटी रुपये होत्या.

मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा २६ टक्क्यांनी वाढून १७,७८९ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२३ अखेर तो १४,११० कोटी रुपये होता. बँकेचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २०२३ मधील ९९,६१४ कोटींवरून वाढून एक लाख २७ हजार १०१ कोटी रुपये झाले आहे. बँकेचे भांडवली पर्याप्तता गुणोत्तर ३१ मार्च २०२३ रोजी १६.२४ टक्क्यांवरून १६.३१ टक्क्यांपर्यंत सुधारला.

अँपवरील निर्बंध दूर

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ बडोदाला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर ‘बॉब वर्ल्ड’ या मोबाईल अॅपद्वारे नवे ग्राहक घेण्याची परवानगी दिली आहे. ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून ‘बॉब वर्ल्ड’ मोबाईल ॲपवर १० ऑक्टोबर २०२३ रोजी निर्बंध लादण्यात आले होते. लागू मार्गदर्शक तत्त्वे आणि विद्यमान कायदे व नियमांनुसार बँक बॉब वर्ल्ड अॅप्लिकेशनद्वारे ग्राहकांची नोंदणी करण्यासाठी मुक्त आहे, असे बँकेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णवाहिकेलाही डिझेल नाही! मृतदेह घेऊन जाणारी गाडी मध्यरात्री पंपावर ठप्प, शासनाच्या नियमालाही हरताळ

पुण्यात टोळीयुद्ध थांबेना! वनराजच्या हत्येनंतर २० महिन्यात आंदेकर टोळीनं तिघांना संपवलं, अजून किती बळी जाणार?

Mumbai Goa Highway: काम अर्धवट पण वसुलीत मात्र हायटेक! निकृष्ट व अपूर्ण काम, तरीही मुंबई-गाेवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका सुरू, रायगडकरांचा उद्रेक

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

NEET Paper Leak Exposed: NEET पेपरफुटीचा भांडाफोड करणारे, व्हायरल PDF दाखवणारे शशिकांत सुथार कोण?

SCROLL FOR NEXT