लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनी दिग्गज मानली जाते. नुकत्याच कंपनीला 2500 कोटी ते 5000 कोटीच्या अनेक ऑर्डर मिळाल्या आहेत. एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग आणि फॅक्टरी व्हर्टिकलला ही वर्क ऑर्डर मिळाली आहे.लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये त्यामुळे वाढ दिसून आली आणि शेअर 3706.10 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 5.09 लाख कोटी झाले.
लार्सन अँड टुब्रो ओमानमध्ये 165 बेड्सचे अल नामा जनरल हॉस्पिटल बांधणार आहे. ओमानच्या सल्तनतच्या आरोग्य मंत्रालयाकडून कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. हा प्रोजेक्ट 30 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. यामध्ये नागरी संरचना, एमइपी सर्व्हिसेस, मेडिकल इक्विपमेंट, फिनिश आणि लँडस्केपिंग यासह एक्सटर्नल डेवलपमेंट्सचाही समावेश असेल.
देशांतर्गत बाजारपेठेत कंपनी आसाममध्ये मां कामाख्या मंदिराचे प्रवेश कॉरिडॉर बांधणार आहे. राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेला ही ऑर्डर डिझाईन आणि बिल्ड टर्नकी आधारावर आहे आणि त्यात मल्टी-युटिलिटी बिल्डिंग, पिलग्रिम मॅनेजमेंट ब्लॉक, चिन्नमस्ता ब्लॉक, सिद्धेश्वर ब्लॉक आणि ऍक्सेस कॉरिडॉरचा समावेश आहे, असे कंपनीने स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.
यामध्ये फिनिशिंग, संबंधित एमइपी सर्व्हिसेस आणि एक्सटर्नल डेवलपमेंटचाही समावेश आहे. एल अँड टी कन्स्ट्रक्शनला गुजरातमध्ये पॉलिमर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी अग्रगण्य पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या उपकंपनीकडून ऑर्डर मिळाली आहे. शिवाय कंपनीला गुजरातमधील सोलर ग्लास मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसाठी सिव्हिल, स्ट्रक्चरल आणि आर्किटेक्चरल कामांची ऑर्डरही मिळाली.
गेल्या एका महिन्यात लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स 7 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत त्यांनी 23 टक्के परतावा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 73 टक्क्यांनी वाढला आहे. इतकेच नाही तर गेल्या 4 वर्षात 378 टक्के बंपर नफा कमावला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.