Adani Group
Adani Group Sakal
Share Market

Adani Group Stock: 4,000 चा शेअर आला 656 रुपयांवर; अदानी समूहाच्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार कंगाल

राहुल शेळके

Adani Group Stock: गौतम अदानी यांच्या शेअर्सनी यावर्षी गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अदानी समुहाचा शेअर जो 4,000 रुपयांवरून 656.50 रुपयांच्‍या पातळीवर घसरला आहे.

या शेअरमध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार अजूनही अडचनीचा सामना करत आहेत. गेल्या काही महिन्यांत स्टॉक 84 टक्क्यांनी घसरला आहे. अदानी टोटल गॅस असे या स्टॉकचे नाव आहे.

24 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानंतर शेअर्स घसरले

या वर्षाच्या सुरुवातीला अदानी टोटल गॅसचा स्टॉक 4,000 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. 24 जानेवारी रोजी अमेरिकन रिसर्च फर्मने जारी केलेल्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते, मात्र सर्वात मोठी घसरण अदानी टोटलच्या शेअर्समध्ये दिसून आली.

23 जानेवारीला हा स्टॉक 4,000 च्या पातळीवर होता

अदानी टोटलचा स्टॉक गेल्या एका वर्षात जवळपास 84 टक्क्यांनी घसरला आहे. 23 जानेवारी रोजीच या शेअरने बाजारात 4,000 रुपयांची 52 आठवड्यांची उच्च पातळी गाठली होती.

सध्या या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 620.05 रुपये आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉक 9.97 टक्क्यांनी घसरला आहे.

आरोपांची चौकशी सुरू

अमेरिकन बाजार नियामक SEC ने हिंडनबर्गने अदानी समूहावर केलेल्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. यानंतर अदानीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

नंतर अदानी समूहाने याबाबत सांगितले की, त्यांना अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. काही लोक स्वार्थापोटी याविरोधात काम करत असल्याचा आरोप अदानी समूहाने केला आहे.

अदानी समूह आणि फ्रेंच कंपनी टोटल एनर्जीज यांची संयुक्त कंपनी अदानी टोटल गॅस लिमिटेड येत्या आठ-दहा वर्षांत 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून गॅस वितरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम केले जाणार आहे.

अदानी टोटल गॅस लिमिटेडच्या (एटीजीएल) वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की वाहनांसाठी सीएनजीची किरकोळ विक्री आणि घरे आणि उद्योगांना गॅस पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तारासाठी गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणूकीमुळे अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये येणाऱ्या काळात वाढ होऊ शकते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT