Bank Share Returns esakal
Share Market

Bank Share Returns : पडझडीच्या काळात 'हे' बँक शेअर्स देतील दमदार परतावा

बाजारात सलग काही दिवस घसरणीसह बंद होतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bank Share Returns : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. बाजारात सलग काही दिवस घसरणीसह बंद होतो आहे. अशात तुम्ही याच्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे असे शेअर बाजार एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला येत्या काळात दमदार रिटर्न देतील अशा काही शेअर्सची लिस्ट आणली आहे.

साऊथ इंडियन बँक (South Indian Bank)

खासगी क्षेत्रातील साऊथ इंडियन बँकेने (South Indian Bank) डिसेंबर तिमाहीत 102.7 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत त्यांना 50 कोटींचा तोटा झाला होता. त्याचवेळी सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेला 223 कोटींचा नफा झाला होता. बँकेचे एकूण ऑपरेटींग उत्पन्न वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढले आहे. तो जवळपास 1,671 कोटी रुपयांवरून 1,898 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. बुधवारी हा शेअर 16.65 रुपयांवर बंद झाला आणि गेल्या 6 महिन्यांत त्याने गुंतवणूकदारांना 110% परतावा दिला आहे.

कर्नाटक बँक (Karnataka Bank)

कर्नाटक बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 301 कोटी रुपयांच्या नफ्यात वार्षिक 105% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला 146 कोटींचा नफा झाला होता. बँकेच्या एसेट क्वालिटीमध्ये सुधारणा आहे. त्याचा एनपीए मागील तिमाहीत 3.36% वरून 3.28% वर आला आहे. नेट एनपीएही 1.72% वरून 1.66% वर आला आहे. बुधवारी हा शेअर सुमारे 3 टक्क्यांच्या घसरणीसह 137 रुपयांवर बंद झाला. गेल्या 6 महिन्यांत 90% चा जबरदस्त परतावा दिला आहे.

युको बँक (UCO Bank)

कोलकातामधील युको बँकेने डिसेंबर तिमाहीत 653 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 310 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हा नफा 110 टक्के अधिक आहे. बुधवारी हा शेअर 1.24 टक्क्यांच्या वाढीसह 24.45 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 114.47% परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT