Bansal Wire Industries files DRHP to raise rs 745 crore via IPO  Sakal
Share Market

IPO News: बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड IPOमधून उभारणार 745 कोटी; पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

Bansal Wire Industries IPO: स्टील वायर उत्पादक कंपनी बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड (Bansal Wire Industries) लवकरच आयपीओ घेऊन येणार आहे. यासाठी कंपनीने मसुदा कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सादर केली आहेत.

राहुल शेळके

Bansal Wire Industries IPO: स्टील वायर उत्पादक कंपनी बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड (Bansal Wire Industries) लवकरच आयपीओ घेऊन येणार आहे. यासाठी कंपनीने मसुदा कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सादर केली आहेत. बन्सल वायरची आयपीओमधून 745 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP) आयपीओमध्ये फक्त नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. विक्रीसाठी कोणतीही ऑफर (OFS) असणार नाही. आयपीओमधून जमा होणारा निधी कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.

बन्सल वायर इंडस्ट्रीज स्टील वायर्सचे उत्पादन आणि निर्यात करते. कंपनी कार्बन स्टील वायर, सौम्य स्टील वायर (लो कार्बन स्टील वायर) आणि स्टेनलेस स्टील वायर असे 3 सेगमेंट्समध्ये काम करत आहे. कंपनीने दादरी इथे सुरू होणार्‍या प्लांटद्वारे स्पेशॅलिटी वायर्सचे एक नवीन सेगमेंट सुरू करण्याची योजना आखली आहे.

कंपनीचे एकूण उत्पन्न 28 टक्के सीएजीआरने वाढून आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,422.56 कोटी झाले जे आर्थिक वर्ष 2021 मध्ये 1,480.41 कोटी होते.

निव्वळ नफा 21.7 टक्के सीएजीआरने वाढून आर्थिक वर्ष 2023 मध्ये 59.93 कोटी झाला, जो आर्थिक वर्ष 2021 मध्ये 40.46 कोटी होता.

या आयपीओसाठी एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि डीएएम कॅपिटल ऍडव्हायझर्स बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT