tata  sakal
Share Market

स्मार्ट गुंतवणूक; टाटा एलेक्सी (शुक्रवारचा बंद भाव : रु. ७६०१)

सध्याच्या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतदेखील टाटा एलेक्सी कंपनीने चांगली कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

भूषण गोडबोले

टाटा समूहातील टाटा एलेक्सी लि. ही एक अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. १९८९ मध्ये स्थापन करण्यात आलेली ही कंपनी परिवहन, माध्यमे, प्रसारण, आरोग्यसेवा आणि इतर उद्योगांना डिझायनिंग आणि अभियांत्रिकी सेवा प्रदान करते. ही कंपनी ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, विद्युतीकरण प्रकल्प; तसेच डिजिटायझेशन प्रकल्प कार्यान्वित करते. मनोज राघवन हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना या क्षेत्रातील २२ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.

सध्याच्या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतदेखील टाटा एलेक्सी कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या तिमाही निकालानुसार, उत्पन्नात वार्षिक आधारावर सुमारे १६ टक्के वाढ नोंदविली असून, या वाढीचे नेतृत्व प्रामुख्याने वाहतूक विभागाने केले आहे. या विभागाने वार्षिक आधारावर सुमारे २६ टक्क्यांची मजबूत वाढ केली आहे. कंपनीने या तिमाहीत ५८५ कर्मचारी घेतले असून, सक्षम मुनष्यबळ तयार करण्यासाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे.

या तिमाहीत, कंपनीने अग्रगण्य ग्लोबल ऑटोमोटिव्ह कंपनीकडून ‘एसडीव्ही’ आणि सॉफ्टवेअरसाठी अनेक वर्षांचा मोठा करार जिंकला आहे; तसेच हेल्थकेअर क्षेत्रातदेखील क्रिटिकल केअर डिव्हाइस प्लॅटफॉर्मच्या अभियांत्रिकी प्रकल्पात बहु-वर्षीय करार जिंकला आहे. इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी कंपनीने एनआयटी-कोझिकोडशी भागीदारी केली आहे. ‘टाटा’ हा ब्रँड नाव कंपनीला, ग्राहकांना; तसेच कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यास मदत करत आहे. कर्जाचे प्रमाण अत्यल्प ठेवून धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर प्रतिवर्ष सुमारे २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, ही कंपनी कार्यक्षेत्रात प्रगती करत आहे.

या कंपनीच्या शेअरने ऑगस्ट २०२२ मध्ये १०,७६० रुपयांचा उच्चांक नोंदविला होता. त्यानंतर डिसेंबर २०२२ पर्यंत शेअरने ५,७०९ रुपयांपर्यंत घसरण दर्शविली. त्यानंतर तो ८,००० ते ५,७०९ रुपये या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शवित आहे. आगामी काळात या शेअरने ८,००० रुपयांच्या पातळीवर बंद भाव दिल्यास तांत्रिक आलेखानुसार तेजीचे संकेत मिळू शकतील. हा शेअर सध्या महाग वाटत असला, तरी दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, दीर्घावधीसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत

गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: सांगरूळ बंधाऱ्यामध्ये कुंभी नदीपात्रात कोंबड्यांचे वेस्टेज

SCROLL FOR NEXT