DLF KP Singh Sakal
Share Market

DLF KP Singh: 91 व्या वर्षी प्रेमात पडणारे DLFचे चेअरमन कंपनीतून पडले बाहेर, मुलींनीही विकला हिस्सा

KP Singh Sold DLF Stake holding: डीएलएफच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे

राहुल शेळके

KP Singh Sold DLF Stake holding: रिअल इस्टेट व्यावसायिक कुशल पाल सिंह- केपी सिंह यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. केपी सिंग यांनी रिअल इस्टेट व्यवसाय कंपनी डीएलएफ (दिल्ली लँड अँड फायनान्स लिमिटेड) मधील त्यांचे उर्वरित हिस्सा विकून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

खरं तर, डीएलएफचे अध्यक्ष एमेरिटस केपी सिंग आणि डीएलएफच्या दोन प्रवर्तक संस्थांनी कंपनीतील त्यांचा हिस्सा 1,087 कोटी रुपयांना विकले आहेत.

केपी सिंग आणि डीएलएफचा हिस्सा खुल्या बाजारातील व्यवहारातून विकला गेला आहे. मल्लिका हाउसिंग कंपनी आणि बेव्हरले बिल्डर्स या दोन प्रवर्तक संस्था ज्यांनी DLF मधील हिस्सा विकला आहे.

DLF मधील हिस्सा का विकला?

केपी सिंग यांच्या दोन मुली पिया सिंग आणि रेणुका तलवार या मल्लिका हाऊसिंगच्या प्रमुख शेअरहोल्डर आहेत आणि त्यांचे वडील केपी सिंग हे बेव्हरली बिल्डर्सचे प्रमुख शेअरहोल्डर आहेत.

मल्लिका हाउसिंग कंपनीने 60 लाख शेअर्स विकले असून बेव्हरली बिल्डर्सने 10.99 लाख शेअर्स या खुल्या बाजारातील डीलद्वारे विकले आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, डीएलएफमधील हे स्टेक अनुक्रमे 0.24 टक्के आणि 0.04 टक्के आहेत.

दुसरीकडे, केपी सिंग आणि बेव्हरली बिल्डर्सने डीएलएफमधील त्यांचे पूर्ण 0.59 टक्के आणि 0.04 टक्के स्टेक विकले आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, केपी सिंग यांनी स्टॉक एक्स्चेंजवर 1,44,95,360 शेअर्स 504.21 रुपये प्रति शेअर या दराने विकले, ज्याचे मूल्य 1,086.98 कोटी रुपये आहे. केपी सिंग यांनी त्यांच्या कंपनी डीएलएफमधील ही हिस्सेदारी का विकली हे स्पष्ट झालेले नाही.

डीएलएफच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

या बातमीमुळे काल डीएलएफच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, आजही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. डीएलएफचे शेअर्स 4.05 रुपये किंवा 0.81 टक्क्यांनी कमी होऊन 495.65 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहेत.

दुसरीकडे, काल बीएसईवर डीएलएफचे शेअर्स 510 रुपयांवर उघडले पण 3.65 टक्क्यांनी घसरून 499.70 रुपयांवर बंद झाले.

केपी सिंग यांचा मुलगा राजीव सिंग यांनी डीएलएफची जबाबदारी स्वीकारली

डीएलएफची सूत्रे सध्या त्यांचा मुलगा राजीव सिंग सांभाळत आहेत. जून 2020 मध्ये, केपी सिंग यांनी 6 दशके कंपनी हाताळल्यानंतर कंपनीच्या अध्यक्ष पदावरुन सेवानिवृत्ती घेतली.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये डीएलएफचे माजी चेअरमन केपी सिंग यांनी सांगितले की ते पुन्हा प्रेमात पडले आहेत. एका बिझनेस चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या नवीन प्रियसीचे नाव शीना आहे आणि 2018 साली कॅन्सरमुळे पत्नी गमावल्यानंतर अनेक वर्षांनी त्यांना पुन्हा जोडीदार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT