Jio Financial Services Sakal
Share Market

Jio Financial Stock: मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्स कंपनीसाठी बीएसईने बदलले नियम, आज शेअर्समध्ये तेजी

Jio Financial Stock: कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत आहेत.

राहुल शेळके

Jio Financial Stock: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची नवीन कंपनी Jio Financial Services Limited च्या सर्किट लिमिटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE ने केलेला बदल आजपासून लागू झाला आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे आणि Jio Financial चे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत आहेत.

शेअरची सर्किट मर्यादा 5 वरून 20% पर्यंत वाढली

देशातील प्रमुख निर्देशांक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या सर्किट लिमिटमध्ये बदल केला आहे. जो 4 सप्टेंबर 2023 पासून लागू झाला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने शेअरची सर्किट मर्यादा 5 टक्क्यांवरून 20 टक्के केली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरची नवीन सर्किट लिमिट निश्चित झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.

लिस्टिंग-दिवसानंतर कंपनीला सतत घसरणीचा सामना करावा लागला. सकाळी 11.33 वाजता, Jio Financial Services चा शेअर 6.87 टक्क्यांच्या वाढीसह 262 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

कंपनी प्रामुख्याने कर्ज देणे, विमा क्षेत्र, पेमॅट, डिजिटल ब्रोकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन या व्यवसायात प्रवेश करत आहे. कंपनीने जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी BlackRock सोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT