BSE stock best performer among global bourses  Sakal
Share Market

BSE Stock: बीएसईच्या नावावर आणखी एक विक्रम; जागतिक बाजारात भारतीय शेअर बाजार सर्वात पुढे

Indian Share Market: गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तेजीच्या जोरावर देशांतर्गत शेअर बाजार सातत्याने नवीन रेकॉर्ड बनवत आहे. भारतीय शेअर बाजाराने नवीन उच्चांकी पातळी गाठली आहे.

राहुल शेळके

Indian Share Market: गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तेजीच्या जोरावर देशांतर्गत शेअर बाजार सातत्याने नवीन रेकॉर्ड बनवत आहे. भारतीय शेअर बाजाराने नवीन उच्चांकी पातळी गाठली आहे. शनिवारच्या व्यवहारातही बाजाराने नवीन शिखर गाठण्यात यश मिळविले. आता आणखी एक अनोखा विक्रम भारतीय बाजारपेठेच्या नावावर नोंदवला गेला आहे.

हा नवा विक्रम भारतीय शेअर बाजारांपैकी एक असलेल्या बीएसईने केला आहे. BSE चे शेअर्स भारतातील दुसऱ्या प्रमुख स्टॉक एक्स्चेंज NSE वर लिस्ट आहेत. बीएसईच्या विविध निर्देशांकांप्रमाणेच बीएसई स्टॉकमध्येही तेजी आहे. ही तेजी इतकी नेत्रदीपक आहे की बीएसई जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

गेल्या एका वर्षात बीएसईच्या शेअर्समध्ये 400 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अशा प्रकारे, BSE शेअर्सनी जगातील इतर कोणत्याही स्टॉक एक्सचेंजच्या शेअर्सच्या तुलनेत सर्वात मोठी वाढ झाली आहे.

'या' कारणांमुळे शेअर्समध्ये तेजी

बीएसईच्या शेअर्समध्ये या तेजीचे कारण रोख बाजारातील वाढ हे आहे. बीएसई हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये BSE 4 ट्रिलियन डॉलरच्या क्लबमध्ये समावेश झाला होता. अशा प्रकारे BSEच्या मार्केट कॅप गणना जगातील सर्वात प्रमुख स्टॉक मार्केटमध्ये केली जाते.

गेल्या एका वर्षात बीएसईचे शेअर्स 430 टक्क्यांनी वाढले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकाच्या अमेरिकन मार्केट इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजचे (ICE) शेअर्स 35 टक्क्यांनी वाढले आहेत. जर आपण इतर प्रमुख बाजारपेठांवर नजर टाकली तर, गेल्या एका वर्षात लंडन स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स 21 टक्क्यांनी वाढले आहेत.

यूएसमधील सीएमई ग्रुपचे शेअर्स 19 टक्क्यांनी, ड्यूश बोअर्सचे शेअर्स 16.7 टक्क्यांनी आणि सिंगापूर स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स 8.8 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज एक्स्चेंज आणि हाँगकाँग एक्सचेंजमधील शेअर्सच्या किंमती घसरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT