IPO  Sakal
Share Market

IdeaForge IPO Listing: गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट! ड्रोन बनवणाऱ्या कंपनीची शेअर बाजारात धमाकेदार एंट्री

गुंतवणूकदारांनी एका लॉटवर 13,800 रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला.

राहुल शेळके

IdeaForge IPO Listing: Ideaforge IPO ची लिस्टिंग आज झाली. कंपनीचे शेअर्स बीएसईवर 94.21 टक्के प्रीमियमसह 1,305.10 रुपयांवर लिस्ट झाले. NSE वर कंपनीचे शेअर्स 93.45% च्या प्रीमियमसह 1300 रुपयांवर लिस्ट झाले.

या IPO साठी कंपनीची इश्यू किंमत 672 रुपये होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी एका लॉटवर 13,800 रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला. या कंपनीच्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

लिस्टिंगच्या एक दिवस आधी, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 510-515 रुपये प्रति शेअरच्या प्रीमियमसह उपलब्ध होते (ideaForge Technologies IPO GMP). एकेकाळी, Ideaforge Technologies IPO चा GMP 530 रुपयांच्या पुढे गेला होता. मात्र, नंतर त्यात थोडी घट झाली.

या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला

ideaForge Technologies IPO चार दिवसांच्या सबस्क्रिप्शन कालावधीत एकूण 106.60 पट सबस्क्राइब झाला. IdeaForge Technologies चा IPO हा 2021 नंतर 100 पेक्षा जास्त वेळा सबस्क्रिप्शन घेतलेला पहिला IPO ठरला.

आघाडीची ड्रोन कंपनी

ideaForge Technologies 2007 मध्ये सुरू झाली. Ideaforge Technologies मॅपिंग, सुरक्षा आणि पाळत ठेवण्यासाठी मानवरहित एयरक्राफ्ट सिस्टम तयार करते. नागरी आणि संरक्षण दोन्ही वापरासाठी ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांच्या यादीत ही कंपनी सातव्या क्रमांकावर आहे.

26-29 जून ही तारीख आधी ideaForge Technologies IPO चे सदस्यत्व घेण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीतील बदलामुळे, या IPO चे सदस्यत्व घेण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ideaForge Technologies IPO साठी, कंपनीने प्रति शेअर 638-672 रुपये किंमत बँड निश्चित केला होता. त्याच वेळी, प्रवर्तकांनी या IPO साठी 22 शेअर्सचा लॉट आकार निश्चित केला होता.

किरकोळ गुंतवणूकदार IPO मध्ये किमान 1 आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करू शकतात. IPO च्या एका लॉटमध्ये 22 शेअर्स होते. IdeaForge च्या सार्वजनिक इश्यूचा एकूण आकार 567 कोटी रुपये आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT