chandrayaan 3 mission isro impact on indian share market up sakal
Share Market

‘चांद्रयाना’मुळे बाजाराची गगनभरारी

चांद्रयान यशस्वीरीत्या उतरणार हे निश्चित झाल्याने, बुधवारी ‘तेजीत’ बंद झालेल्या शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारीदेखील चढती राहिली.

सुहास राजदेरकर

- सुहास राजदेरकर

सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या ‘चांद्रयान-३’ या यशस्वी मोहिमेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावरसुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे आणि पुढेही दिसेल. चांद्रयान यशस्वीरीत्या उतरणार हे निश्चित झाल्याने, बुधवारी ‘तेजीत’ बंद झालेल्या शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारीदेखील चढती राहिली.

मात्र, बाजार बंद होताना ती टिकू शकली नाही, त्याची कारणे वेगळी आहेत. या यशस्वी मोहिमेकडे फक्त छोट्या कालावधीसाठी न पहाता दीर्घ कालावधीमध्ये एकूण अर्थव्यवस्था; संबंधित उद्योगक्षेत्रे, कंपन्या आणि शेअरवर त्याचा सकारात्मक परिणाम संभवतो, ते पाहाणे गरजेचे आहे.

अमर्याद विकासाची संधी

पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे याला आकाशाचीसुद्धा मर्यादा नाही. जागतिक स्तरावर ३७ लाख कोटी रुपये इतक्या प्रचंड असणाऱ्या ‘अवकाश’ उद्योगामध्ये भारताचा वाटा अवघा पाच टक्के अर्थात दोन लाख कोटी रुपये इतकाच आहे.

जागतिक स्तरावरावरील ‘एलॉन मस्क’ सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची नजर या विभागातील चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांवर पडली आणि या क्षेत्रामधील; तसेच संपूर्ण भारतामधील परकी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली, तर नवल वाटायला नको. एकूणच, भारताची प्रतिमा उंचावली जाऊन बाजारातील वातावरण अधिक सकारात्मक होईल.

आकर्षक उद्योगक्षेत्रे आणि कंपन्या

अवकाश संशोधन, टेलिकम्युनिकेशन, संरक्षण, सॉफ्टवेअर या उद्योगांना विशेष संधी मिळणार आहे. आपल्या देशांबरोबरच, विदेशांमधूनही या कंपन्यांना मागणी येण्याची शक्यता आहे. कारण या यशस्वी चांद्रयान मोहिमेमुळे, देशातील या कंपन्या तसेच ‘इस्रो’ आणि आपले वैज्ञानिक यांची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे.

नोंदणीकृत १० कंपन्या

हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि. : या सरकारी कंपनीने चांद्रयानासाठी हार्डवेअर पुरविले होते. संरक्षण क्षेत्रामध्ये देश तसेच विदेशामधून मागणी.

भारत इलेक्ट्रॉनिक्स : या सरकारी कंपनीने चांद्रयान उभारणीमध्ये पेलोड्स बनवण्यासाठी मदत केली.

लार्सन अँड टुब्रो : कंपनीच्या एरोस्पेस विभागाने महत्वाचे सुटे भाग पुरविले; तसेच काही उपकरणांच्या टेस्टिंगमध्ये मदत.

पारस डिफेन्स : तुलनेने लहान असलेल्या या कंपनीने इलेक्ट्रॉनिक आणि जड धातू उपकरणे पुरविली.

एमटीएआर टेक्नॉलॉजी : विकास इंजिन, टर्बो पंप, बूस्टर पंप यांचा पुरवठा

मिश्र धातू निगम लि. : हैद्राबाद येथील या कंपनीने कोबाल्ट, निकेल टिटॅनियम यांचा वापर असलेली उपकरणे पुरविली

भेल : या सरकारी कंपनीने टिटॅनियम टॅंक आणि बॅटरीचा पुरवठा केला

सेंटम इलेक्ट्रॉनिक्स : इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स आणि स्पेस अप्लिकेशनमध्ये मदत

अवांटेल : या हैद्राबाद येथील कंपनीची इस्रोला महत्त्वाची मदत

गोदरेज इंडस्ट्रीज : मागील ३० वर्षांत या कंपनीने इस्रोला १७५ इंजिने पुरविली आहेत

असे म्हणतात, की ‘बाय ऑन रुमर अँड सेल ऑन न्यूज’ अर्थात ‘अफवा किंवा कुणकुण असेल, तेव्हा खरेदी करा आणि बातमी आली, की विका’. वर उल्लेख केलेल्या कंपन्यांच्या शेअरचे भाव याआधीच खूप चढले आहेत.

सर्वसामान्य गुंतवणूकदार बातमी आली, की (२४ ऑगस्ट २०२३) खरेदी करतात; परंतु चतुर ट्रेडर मात्र, बातमी आली, की विकतात कारण त्यांनी ते अशी बातमी येऊ शकते म्हणून शेअर आधीच खरेदी केलेले असतात. सोबतच्या तक्त्यावरून हे सिद्ध होते.

तात्पर्य : या कंपन्यांचे शेअर ही शिफारस किंवा सल्ला नाही. बाजार आणि शेअरचे भाव राजकीय स्थिरता, पाऊसपाणी, जागतिक शांतता, कच्या मालाचे भाव, लिक्विडीटी, आदी अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. त्यामुळे बाजाराचा आणि कंपनीचा सखोल अभ्यास नसेल, तर तज्ज्ञ आणि अनुभवी सल्लागारांची मदत घेणे योग्य राहील.

कंपनी -चांद्रयान निघाले तेव्हाचा बंद भाव (१४ जुलै)- चांद्रयान पोचल्याच्या बातमीनंतरचा सर्वाधिक भाव (२४ ऑगस्ट) - शुक्रवार, २५ ऑगस्टचा बंद भाव

  • हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि.- ३,८३६ -४,१३८ -३,९१०

  • लार्सन अँड टुब्रो -२,४७३ -२,७६७ -२,६३९

  • पारस डिफेन्स -६८१ -८४२ -७५५

  • एमटीएआर टेक्नॉलॉजी -२,११२ -२,४५० -२,२५४

  • मिश्र धातू निगम लि. -३१३ -४२६ -४०२

  • भेल -९२ -११३ -१०५

  • सेंटम इलेक्ट्रॉनिक्स -१,४०४ -१,९७० -१,७३५

(लेखक ‘ए३एस’ फायनान्शिअल सोल्युशन्सचे प्रवर्तक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

SCROLL FOR NEXT