Chandrayaan 3 Sakal
Share Market

Chandrayaan 3: चंद्रावर फडकला तिरंगा अन् 13 कंपन्यांनी कमावले 20,000 कोटी

Chandrayaan 3 Updates: भविष्यात या कंपन्या जागतिक प्रकल्पांचा भाग बनू शकतात

राहुल शेळके

Chandrayaan 3 Updates: भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्रावर पाऊल ठेवून तिरंगा फडकावून इतिहास रचला आहे. हे यश एका इस्रोचे नाही तर त्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व कंपन्यांचे आहे.

विशेष म्हणजे चांद्रयान चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वीच देशातील 13 कंपन्यांनी 20 हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. या अशा कंपन्या आहेत, ज्या एरोस्पेस व्यवसायाशी संबंधित आहेत. येत्या काळात त्यांची कमाई वाढण्याची शक्यता आहे.

खरं तर, या 13 कंपन्यांनी भारताच्या शेअर बाजारातून कमाई केली आहे. जवळपास आठवडाभरापासून या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होत असून त्यामुळे त्यांच्या मार्केटमध्येही वाढ झाली आहे. चांद्रयान 3 ने चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वीच डझनभर कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 20,000 कोटी रुपयांची वाढ झाली होती.

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, रॉकेटच्या नेव्हिगेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स घटकांपासून मेटल गियर्सपर्यंतच्या उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या 13 कंपन्यांच्या शेअर्सने या आठवड्यात मार्केट कॅपमध्ये 2.5 अब्ज डॉलर म्हणजेच 20 हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान-3 ने बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. असे करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.

कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये किती वाढ?

अंतराळयान पुरवठादारांपैकी औद्योगिक गॅस कंपनी लिंडे इंडियाला सर्वाधिक फायदा झाला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सेन्टम इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स, ज्याने मिशनसाठी महत्त्वपूर्ण मॉड्यूल्स आणि सिस्टम्सचा पुरवठा केला या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांहून अधिक वाढले. सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रोव्हायडर Avantel, ज्याचा ग्राहक स्वतः ISRO आहे, त्यांच्या शेअर्समध्ये 12 टक्के वाढ झाली आहे.

तज्ञ काय म्हणतात

मुंबई स्थित वेल्थमिल्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या स्ट्रॅटेजिस्ट क्रांती बथिनी यांनी सांगितले की, चंद्र मोहिमेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये भाग घेतल्याने या क्षेत्रातील कंपन्यांसाठी संधी उपलब्ध होऊ शकतात. त्या म्हणाल्या की, कंपन्या भविष्यात जागतिक प्रकल्पांचा भाग बनू शकतात आणि त्यांची उत्पादने आणि सेवा निर्यात करू शकतात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT