Delhivery Shares esakal
Share Market

Delhivery Shares : डेल्हिवरीच्या शेअर्समध्ये बल्क डील, सॉफ्टबँकने विकली 954 कोटीची भागिदारी

डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस सॉफ्टबँकेकडे डेल्हिवरीमध्ये 18 टक्के हिस्सा होता.

सकाळ डिजिटल टीम

Delhivery Shares : जपानी इन्व्हेस्टमेंट फर्म सॉफ्टबँकने लॉजिस्टिक फर्म डेल्हिवरीचे 954 कोटीचे शेअर्स एका बल्क डीलमध्ये विकले आहेत. हे शेअर्स 340 रुपये प्रति शेअर या दराने विकले गेले आहेत. बीएसईवर उपलब्ध आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. जपानी फंडाने सुरुवातीला डेल्हिवरीत सुमारे 38 कोटी डॉलर्सची (3,100 कोटी) गुंतवणूक केली होती. यापैकी, त्याने आयपीओच्या वेळी 75 दशलक्ष डॉलर्स (618 कोटी) किमतीचे शेअर्स विकले. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस सॉफ्टबँकेकडे डेल्हिवरीमध्ये 18 टक्के हिस्सा होता.

याआधीही फेब्रुवारीमध्ये डेल्हिवरीच्या शेअर्समध्ये एक बल्क डिल दिसली, जेल्हा टायगर ग्लोबलने कंपनीने 1.2 कोटी शेअर्स प्रत्येकी 335 रुपये दराने विकले होते. या विक्रीसह, सॉफ्टबँकने डेल्हिवरीमधील आपला हिस्सा सुमारे 14 टक्के आणि टायगर ग्लोबलमध्ये 2.98 टक्के कमी केला आहे.

लिस्टिंग झाल्यापासून डेल्हिवरीचे शेअर्स 36 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनीने नुकत्याच संपलेल्या डिसेंबर तिमाहीत 195.7 कोटीचा निव्वळ तोटा नोंदवला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 127 कोटी होता. ट्रेडिंगमधून कंपनीचे उत्पन्न डिसेंबर तिमाहीत 1,823.8 कोटी रुपयांवर घसरले आहे जे मागील वर्षीच्या तिमाहीत 2,019 कोटी होते. डेल्हिवरीचा मागील बारा महिन्यांचा ऑपरेटिंग तोटा 340 कोटी आहे आणि तिचे बाजार भांडवल 25 हजार कोटी आहे. त्या तुलनेत, ब्लू डार्टचा 12 महिन्यांचा ऑपरेटिंग नफा 1,030 कोटी रुपये आहे, तर मार्केट कॅप 14,700 कोटी रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT