Delta Corp shares hit 3-year low after tax demands rise to Rs 23,200 crore  Sakal
Share Market

Delta Corp: डेल्टा कॉर्प कंपनीला मोठा धक्का, शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, काय आहे कारण?

Delta Corp: डेल्टा कॉर्पचे शेअर्स आज 3 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

राहुल शेळके

Delta Corp Shares: डेल्टा कॉर्पला कर नोटीस मिळाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आज कंपनीचा शेअर 12 टक्क्यांनी घसरला आहे आणि एका वर्षातील सर्वात कमी किंमतीवर (122.60 रु) पोहोचला आहे. कंपनी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे.

कंपनी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. यापूर्वी, सरकारने ऑनलाइन गेमिंगवरील जीएसटी 28 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता कंपनीला 23,200 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. या दोन्ही बातम्यांचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला आहे.

गेमिंग कंपनी डेल्टा कॉर्पचे शेअर्स आज 3 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. जुलैच्या मध्यापासून कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे.

22 सप्टेंबर रोजी कंपनीला 11,140 कोटी रुपयांचा जीएसटी भरण्याची नोटीसही मिळाली होती. याशिवाय, कंपनीला कॅसिनो डेल्टिन डेन्झोंग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा प्लेजर क्रूझ या तिन्ही उपकंपन्यांद्वारे 5,682 कोटी रुपयांच्या कराची नोटीस देखील पाठवण्यात आली होती. कंपनीकडून यासंदर्भात जीएसटी विभागाला निवेदन पाठवण्यात आले आहे.

कंपनीचा व्यवसाय काय आहे?

डेल्टा कॉर्प कंपनी कॅसिनो व्यवसायत गुंतलेली आहे. याशिवाय, कंपनी रिअल इस्टेट, गेमिंग, हॉस्पिटॅलिटी आणि इतर व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे. कंपनी DELTIN ब्रँड अंतर्गत गेमिंग आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय चालवत आहे. कंपनीचे गोव्यात तीन कॅसिनो आहेत, ज्यात डेल्टिन रॉयल, डेल्टिन जेएक्यूके आणि डेल्टिन कॅराव्हेला यांचा समावेश आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT