Delta Corp shares tank 20 percent after gaming company receives tax notice of Rs 16,822 crore  Sakal
Share Market

Delta Corp: एक टॅक्स नोटीस अन् कंपनीला 50 मिनिटांत 937 कोटींचा फटका! नेमकं प्रकरण काय?

Delta Corp: कंपनीला कराबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

राहुल शेळके

Delta Corp: शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर, कॅसिनो कंपनी डेल्टा कॉर्पला जीएसटीने सुमारे 17,000 कोटी रुपयांची कर नोटीस पाठवली. या बातमीनंतर सोमवारी बाजार उघडल्यावर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. गेल्या आठवड्यात हा शेअर 175.40 रुपयांवर बंद झाला. जुलैमध्ये जीएसटी कौन्सिलने गेमिंग कंपन्यांवर 28 टक्के कर लावला होता. तेव्हापासून कंपनी संकटाचा सामना करत आहे.

आज शेअर बाजार उघडताच कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्री सुरू झाली आणि कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरून 140.20 रुपयांवर आले.

डेल्टा कॉर्पवर 11,140 कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी असल्याचा आरोप आहे. याबाबत कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीसमध्ये सरकारने कंपनीला 11,140 कोटी रुपयांचा कर, व्याज आणि दंडासह 16,822 कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. सरकारने डेल्टा कॉर्पवर लावलेला दंड गेल्या 10 वर्षांतील कंपनीच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे.

50 मिनिटांत 937 कोटी रुपयांचे नुकसान

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, आज कंपनीचे शेअर्स 157.75 रुपयांच्या घसरणीसह उघडले आणि सुमारे 50 मिनिटांत म्हणजेच सकाळी 10.05 वाजता ते 20 टक्क्यांनी घसरून 140.20 रुपयांवर आले.

कंपनीचे मार्केट कॅप 3,750.24 कोटी रुपयांवर आले होते. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 175.25 रुपयांवर बंद झाले आणि मार्केट कॅप 4,687.80 कोटी रुपये होते. याचा अर्थ बाजार उघडल्यानंतर 50 मिनिटांत कंपनीचे 937.56 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT