E Scooter
E Scooter sakal
Share Market

E Scooter : 5 वर्षात 2400% रिटर्न, आता ई-स्कूटर व्यवसायात उतरण्याची तयारी...

सकाळ डिजिटल टीम

E Scooter : गोयल ऍल्युमिनिअम्स (Goyal Aluminiums) ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. गोयल ऍल्युमिनिअम्सच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. त्यामुळे गोयल ऍल्युमिनिअम्सचे शेअर्स मल्टीबॅगर शेअर्सच्या लिस्टमध्ये येतात.

आता या कंपनीने इलेक्ट्रिक-स्कूटर व्यवसायात उतरण्याची घोषणा केली आहे, त्यानंतर तिचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी 'रोली ई इंडिया' नावाचे नवीन युनिट स्थापन केल्याचे कंपनीने सांगितले. हे युनिट भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन ई-स्कूटर्स आणि हळू चालणाऱ्या ई-स्कूटर्स तयार करणार आहेत. (E Scooter business 2400 percent return in five years )

कंपनीचा हा निर्णय भारत सरकारच्या 'स्वच्छ भारत, हरित भारत' उपक्रमाशी सुसंगत आहे, ज्या अंतर्गत देशातील वाढते प्रदूषण थांबवण्याचे उद्दिष्ट आहे. रोली इंडियाने श्री राम फायनान्स सोबत एक करार केला आहे, जो त्यांच्या ई-स्कूटर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना फायनान्ससंबंधित ऑफर देईल.

गोयल ऍल्युमिनिअम्सचे शेअर्स सध्या 286.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 218.44% वाढ झाली आहे. आणि गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 233.26% चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

गोयल ऍल्युमिनिअम्सच्या शेअर्स बीएसईवर 27 मार्च 2018 रोजी लिस्ट झाले, त्यावेळी त्याच्या शेअर्सची किंमत फक्त 11.49 रुपये होती, जी आता वाढून 286.60 रुपये झाली आहे. अशा प्रकारे, गेल्या 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 2,394.34% ची वाढ झाली आहे.

याचा अर्थ एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी गोयल ऍल्युमिनियमच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 24.94 लाख झाले असते. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात तीन पटीने वाढ केली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT