Ex-Wipro CEO Delaporte sells rs 34.5-crore shares after his exit  Sakal
Share Market

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

Ex-Wipro CEO Delaporte: विप्रो लिमिटेडचे ​​माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) थियरी डेलापोर्टे यांनी गेल्या महिन्यात 34.5 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. 6 एप्रिल रोजी कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर त्यांची कमाई 70.63 कोटी रुपये झाली आहे.

राहुल शेळके

Ex-Wipro CEO Delaporte: विप्रो लिमिटेडचे ​​माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) थियरी डेलापोर्टे यांनी गेल्या महिन्यात 34.5 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. 6 एप्रिल रोजी कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर त्यांची कमाई 70.63 कोटी रुपये झाली आहे. गेल्या महिन्यात डेलापोर्टे यांच्या जागी श्रीनिवास पल्लिया यांना सीईओ बनवण्यात आले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीनामा दिल्यानंतर डेलापोर्टे यांनी 26 एप्रिल रोजी पहिल्यांदा 21.4 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. यानंतर 8 मे रोजी 13.1 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. 2023-24 मध्ये विप्रोचा महसूल 3.8% ने घसरुन 10.8 अब्ज डॉलर झाला, तर Tata Consultancy Services Ltd चा महसूल 4.12% ने वाढून 29 अब्ज डॉलर झाला आणि Infosys Ltd चा महसूल 1.9% ने वाढून 18.56 बिलियन डॉलर झाला.

अहवालानुसार, 6 जुलै 2020 ते एप्रिल 6, 2024 दरम्यान डेलापोर्टेच्या जवळपास चार वर्षांच्या कार्यकाळात, त्यांनी 83.7 कोटी किमतीचे विप्रोचे शेअर्स विकले आहेत, ज्यामुळे त्यांची एकूण शेअर्सची विक्री 118.2 कोटी झाली आहे.

2020 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती

जुलै 2020 मध्ये Wipro चे CEO म्हणून नियुक्त केलेले डेलापोर्टे यांनी कंपनीच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ते गेल्या वर्षीपर्यंत भारतीय आयटी क्षेत्रातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ होते. डेलापोर्टेच्या पगाराच्या पॅकेजने एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएसच्या अधिकाऱ्यांना मागे टाकले. डेलापोर्टेचे वार्षिक वेतन 82 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

56 वर्षीय थियरी डेलापोर्टे हे फ्रान्सचे रहिवासी आहेत. डेलापोर्टे यांना जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन दशकांचा अनुभव आहे. विप्रोच्या सीईओची भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्यांनी कॅपजेमिनी या प्रसिद्ध फ्रेंच आयटी फर्ममध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT