GAIL India Shares esakal
Share Market

GAIL India Shares : गेल इंडियाच्या शेअर्समध्ये तेजी, 8 महिन्यांच्या उच्चांकावर शेअर

गेल इंडियाचा स्टॉक सहा महिन्यांत सुमारे 17 टक्के आणि एका वर्षात 19 टक्क्यांनी वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

GAIL India Shares : गेल इंडियाच्या (GAIL India) शेअर्समध्ये शुक्रवारी 5 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. इंट्राडेमध्ये गेल इडियाचा शेअर 103.35 रुपयांवर पोहोचला. सरकारी गॅस ट्रान्समिशन / मार्केटिंग कंपनीसाठी हा 8 महिन्यांतला उच्चांक आहे. याआधी, 19 एप्रिल 2022 रोजी शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांक अर्थात 116 रुपयांवर गेला होता. गेल इंडियाचा स्टॉक सहा महिन्यांत सुमारे 17 टक्के आणि एका वर्षात 19 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल इंडिया ही गॅस युटिलिटी कंपनी आहे जी गॅस ट्रान्समिशन आणि ट्रेडिंग, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG), एलएलच (LLC) आणि पेट्रोकेमिकल्ससारख्या सेगमेंट्समध्ये आहे. कंपनीची सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) क्षेत्रातही गुंतलेली आहे.

गेल इंडियाने अमेरिकेतील एलएनजी लिक्विफिकेशन प्लांटमधील 26 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या विचारात असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एका सरकारी मालकीच्या कंपनीने अमेरिकेत केलेली ही पहिली एनर्जी ऍसेट खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी गेल इंडियाच्या शेअरवर बाय रेटींग दिले आहे.

नवीन स्त्रोतांकडून पुरवठा वाढल्याने गॅस ट्रान्समिशन आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुधारण्याची शक्यता असल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ऍनालिस्ट्सने सांगितले. गॅसच्या किमतीत आणखी घसरण झाल्याने, पेटकेम आणि एलपीजी/ एलएलएचच्या कामगिरीत सुधारणा होण्याची आशा आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT