Gautam Adani Sakal
Share Market

Gautam Adani : गौतम अदानींना टॉप-25 श्रीमंतांच्या यादीतूनही मिळाला नारळ, आता राहिली 'एवढी' संपत्ती

हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून एका महिन्यात गौतम अदानी यांच्या संपत्तीवर परिणाम झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bloomberg Billionaires Index Gautam Adani : हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून एका महिन्यात गौतम अदानी यांच्या संपत्तीवर परिणाम झाला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरूच आहे.

अदानींची एकूण संपत्ती आता 42.7 अब्ज डॉलरवर आली आहे. यासोबतच त्यांना जगातील 25 श्रीमंतांच्या यादीतूनही नारळ मिळाला आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांची 29 व्या स्थानावर घसरण झाली आहे. हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून, अदानी यांच्या संपत्तीत सुमारे 75 अब्ज डॉलरची घट झाली आहे. या वर्षी त्यांची संपत्ती सुमारे 77.9 अब्ज डॉलरने कमी झाली आहे.

श्रीमंतांच्या यादीत आता 28 उद्योगपती अदानींच्या पुढे आहेत. Giovanni Ferrero & Family हे अदानीच्या अगदी पुढे आहेत आणि ब्लूमबर्गच्या यादीत 28 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 42.9 अब्ज डॉलर एवढी आहे.

त्याचप्रमाणे, फिल नाइट अँड फॅमिली 45.1 अब्ज डॉलर संपत्तीसह 27 व्या स्थानावर आहेत. मायकेल डेल 48.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 26 व्या स्थानावर आहेत.

पहिल्या10 श्रीमंतांच्या यादीत एकही भारतीय नाही :

ब्लूमबर्गच्या यादीनुसार, जगातील 10 श्रीमंतांच्या यादीत सध्या एकही भारतीय नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 81.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 12 व्या स्थानावर आहेत.

बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या स्थानावर :

ब्लूमबर्गच्या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट हे 189 अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. यानंतर अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क दुसर्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 183 अब्ज डॉलर एवढी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT