Share Market Sakal
Share Market

Share Market Tips : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' कंपनीचे शेअर्स देतील दमदार परतावा, तुमच्याकडे आहेत का?

शेअर मार्केट तज्ञांना यामध्ये आणखी तेजी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Tips : कलर आणि पिगमेंट बनवणारी कंपनी सुदर्शन केमिकलचे (Sudarshan Chemical) शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता दिसून येत आहे. नुकतेच हे शेअर्स दोन टक्क्यांहून अधिक कमजोर झाले आहेत.

सध्या ते एका वर्षाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले असले तरी लाँग टर्ममध्ये गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. पण त्याचवेळी शेअर मार्केट एक्सपर्ट्सने यामध्ये आणखी तेजी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

सुदर्शन केमिकलचे शेअर्स बीएसईवर 2.22 टक्क्यांनी घसरून 374.85 रुपयांवर बंद झाले. त्याची मार्केट कॅप 2,594.98 कोटी आहे.

सुदर्शन केमिकलचे शेअर्स 19 डिसेंबर 2002 रोजी फक्त 3.73 रुपयांवर होते. आता ते 100 पटीने वाढून 374.85 रुपयांवर पोहोचले आहेत. सुदर्शन केमिकलने 21 वर्षात गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांचे 1 कोटी केले आहेत.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

11 फेब्रुवारी 2022 रोजी सुदर्शन केमिकलचे शेअर्स 609.70 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. यानंतर 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत ते 43 टक्क्यांनी घसरून 345 रुपयांवर आले, जो 52 आठवड्यांचा विक्रमी नीचांक आहे. या नीचांकीवरून 9 टक्के रिकव्हरी झाली आहे.

सुदर्शन केमिकलसाठी डिसेंबर 2022 ची तिमाही काही खास नव्हती. महसुलात 3 टक्क्यांची घट, अपेक्षेपेक्षा जास्त खर्च आणि जास्त आर्थिक खर्च यामुळे त्याच्या नफ्यावर परिणाम झाला.

देशांतर्गत बाजारपेठेतील त्याचे लीडरशिप पोझिशन आणि जागतिक स्तरावर दोन मोठ्या कंपन्या आता डेली पिगमेंट व्यवसायापासून दूर जात असताना ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीज सुदर्शन केमिकलबाबत पॉझिटीव्ह आहेत. शिवाय त्यांना 435 रुपयांचे टारगेटसह बाय रेटिंग आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT