Happy Forgings IPO to open on Dec 19 Key things to know about rs 1009-cr issue  Sakal
Share Market

Happy Forgings: प्राइस बँड निश्चित झाल्यानंतर हॅपी फोर्जिंग्सच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये क्रेज

Happy Forgings IPO: आयपीओ सुरू होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सना मोठी मागणी आहे.

राहुल शेळके

Happy Forgings IPO : हॅपी फोर्जिंग्सचा (Happy Forgings) आयपीओ 19 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि 21 डिसेंबरला बंद होईल. कंपनीने यासाठी 808-850 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. या आयपीओमधून कंपनीचा 1,008.59 कोटी उभारण्याचा मानस आहे.

प्राइस बँडच्या घोषणेनंतर, ग्रे मार्केट प्रीमियममध्ये म्हणजे इश्यूच्या जीएमपीमध्ये वाढ झाली आहे. अँकर गुंतवणूकदार 18 डिसेंबरपासूनच बोली लावू शकतील.

आयपीओ सुरू होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सना मोठी मागणी आहे. गुरुवारी हा इश्यू अनलिस्टेड मार्केटमध्ये 450 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. याचा अर्थ अप्पर प्राइस बँडनुसार कंपनीचे शेअर्स 1300 रुपयांच्या किंमतीला लिस्ट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांना सुमारे 53 टक्के बंपर नफा मिळेल.

आयपीओ अंतर्गत 400 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, विद्यमान भागधारकांच्या वतीने 71.6 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील.

ओएफएसचा भाग म्हणून, प्रमोटर परितोष कुमार गर्ग (HUF) 49.2 लाख इक्विटी शेअर्स विकतील आणि उर्वरित 22.4 लाख शेअर्स इन्व्हेस्टर इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड-III द्वारे विकले जातील. सध्या, प्रमोटर्सकडे कंपनीत 88.24 टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित शेअर्स इन्व्हेस्टर इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड-III कडे आहेत.

आयपीओच्या उत्पन्नातून कंपनी 171.1 कोटी रुपये इक्विपमेंट्ससाठी शिवाय प्लांट आणि मशिनरी खरेदीसाठी वापरणार आहे. याशिवाय 152.76 कोटी रुपयांचे कर्जही या निधीतून फेडण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी बाजूला ठेवली जाईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT