Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Today: हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम शेअर बाजारावर होणार? 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips (Top Shares): शुक्रवारी 9 ऑगस्टला भारतीय इक्विटी इंडेक्सने चांगली रिकव्हरी केली आणि मागील व्यापार सत्रातील घसरणीची भरपाई करून सर्व सेक्टरमधील खरेदीमुळे एक टक्का वाढ झाल्याचे दिसून आले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी 9 ऑगस्टला भारतीय इक्विटी इंडेक्सने चांगली रिकव्हरी केली आणि मागील व्यापार सत्रातील घसरणीची भरपाई करून सर्व सेक्टरमधील खरेदीमुळे एक टक्का वाढ झाल्याचे दिसून आले.

व्यवहाराच्या सत्राअखेर सेन्सेक्स 819.69 अंकांनी अर्थात 1.04 टक्क्यांनी वाढून 79,705.91 वर आणि निफ्टी 250.50 अंकांनी म्हणजेच 1.04 टक्क्यांनी वाढून 24,367.50 वर बंद झाला. मात्र या आठवडाभरात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांनी घसरले आहेत.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शुक्रवारी निफ्टीची वाढीसह सुरुवात झाली आणि 248 अंकांच्या वाढीसह बंद झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. डेली चार्टवर, निफ्टी 25100 ते 23900 पर्यंत घसरत आहे. निफ्टी आता 24520-24651 च्या दिशेने जाऊ शकतो. तर खाली 24200 - 24150 वर सपोर्ट आहे. ही त्याची 40-डे एव्हरेजदेखील आहे.

बँक निफ्टीमध्येही तेजी दिसून आली, आणि तो हिरव्या रंगात बंद होण्यात यशस्वी झाला. पीएसयू बँकांमध्ये मोठी वाढ दिसून आली. एकंदरीत, बँक निफ्टीही एकंदर बाजारासह पुढे जाऊ शकतो आणि 50750 - 50800 च्या दिशेने पुनरागमन करू शकतो. यासाठी 50100 - 50000 लेव्हलवर सपोर्ट आहे.

जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टी 44 अंकांनी घसरून 24,357 वर बंद झाला. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्ये संमिश्र व्यवहार होता. मात्र, हिंडेनबर्ग अहवालातील सेबी प्रमुखांवरील आरोपांचा आजच्या कामकाजावर काय परिणाम होतो हे पाहणे बाकी आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • लुपिन लिमिटेड(LUPIN)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT