Pharma Shares sakal
Share Market

Income Tax Raid: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा, शेअर्समध्ये 5.50% ची घसरण

कंपनीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mankind Pharma Income Tax Raid: दोन दिवसांपूर्वी शेअर बाजारात मोठी लिस्टिंग झालेल्या कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीवर वाईट परिणाम होत आहे.

कारवाई 1-2 दिवस चालू शकते:

झी बिझनेस या वृत्तवाहिनीच्या एका बातमीत सूत्रांनी सांगितले की, प्राप्तिकर विभागाने मॅनकाइंड फार्माच्या दिल्ली कार्यालयाची झडती घेतली आहे. आयकर विभागाची ही कारवाई पुढील 1-2 दिवस सुरू राहू शकते. ही बातमी समोर येताच नुकत्याच लिस्टेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले.

कागदपत्रांची छाननी सुरू:

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये कंपनीच्या जागेवर आयकर विभागाच्या कारवाईलाही पुष्टी मिळाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली आणि आसपासच्या ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. आयकर विभाग कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे आणि चौकशी करत आहे.

मॅनफोर्स कंडोमसह अनेक लोकप्रिय उत्पादने बनवणारी ही औषध कंपनी मंगळवारीच बाजारात लिस्ट झाली आहे. कंपनीने बाजारात दमदार पदार्पण केले होते आणि पहिल्याच दिवशी तिच्या शेअर्सच्या किंमती 31.7 टक्क्यांनी वाढल्या होत्या.

मात्र, दोन दिवसांतच कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीला सामोरे जावे लागले. आजच्या घसरणीचा कंपनीच्या बाजार भांडवलावरही परिणाम झाला आहे. दुपारी 12 वाजता, कंपनीचा शेअर बीएसईवर 5.48 टक्क्यांनी घसरून 1,306 रुपयांवर व्यवहार करत होता. आता कंपनीचा एमकॅप 53,680 कोटी रुपयांवर आला आहे.

IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला:

विक्रीच्या बाबतीत मॅनकाइंड फार्मा ही देशांतर्गत दुसरी सर्वात मोठी औषधी कंपनी आहे. कंपनीने 4,326 कोटी रुपयांचा IPO आणला होता, जो या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आहे. IPO नंतर, कंपनीचा स्टॉक 9 मे रोजी 20 टक्के प्रीमियमवर 1,300 रुपयांवर सूचीबद्ध झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS : अभिषेक शर्माची वादळी खेळी, मार्को यान्सेनचा 'वन हँड' कॅच... पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले, बरेच काही घडले

"चुकीच्या माणसांमुळे आयुष्यात खूप मोठी किंमत मोजली," सोनाली कुलकर्णीने व्यक्त केली खंत ; म्हणाली…

PSL Controversy: PSLमध्ये परत राडा... डॅरील मिचेलने 'फेकाड्या' उस्मान तारीकचा बॉल खेळायला नकार अन्... Video Viral

Government Jobs: तब्बल २३ वर्षांनंतर मोठा बदल! महाराष्ट्रात ८,६६९ सरकारी पदांसाठी भरतीची घोषणा; अर्ज प्रक्रिया कधीपासून?

8th Pay Commission Salary Hike : आठवा वेतन आयोग लागू झाल्यास फरक मिळणार? कोणाला किती पगार वाढणार जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT