Indian Railway Finance Corporation share price Sakal
Share Market

Railway Stock: गुंतवणूकदारांना केलं मालामाल! आयपीओनंतर 'या' रेल्वे स्टॉकमध्ये रॉकेटच्या वेगाने वाढ

Railway Stock: केंद्र सरकारकडून रेल्वेच्या विकासासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. अशातच शेअर बाजारात सध्या रेल्वेच्या अनेक शेअर्समध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. यामध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पच्या (IRFC) शेअर्सचाही समावेश आहे.

राहुल शेळके

Railway Stock: केंद्र सरकारकडून रेल्वेच्या विकासासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. अशातच शेअर बाजारात सध्या रेल्वेच्या अनेक शेअर्समध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. यामध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पच्या (IRFC) शेअर्सचाही समावेश आहे. (Indian Railway Finance Corporation share price)

आयआरएफसी (IRFC) स्टॉकमध्ये गेल्या 6 महिन्यांत आणि एका वर्षात प्रचंड वाढ झाली आहे आणि शेअरची किंमत अनेक पटींनी वाढली आहे. आयआरएफसीच्या आयपीओपासून तीन वर्षात त्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पचा आयपीओ जानेवारी 2021 मध्ये आला होता. यानंतर, शेअरची किंमत नोव्हेंबर 2022 पर्यंत 20 ते 25 रुपयां दरम्यान राहिली. यानंतर, नोव्हेंबर 2022 ते जुलै 2023 पर्यंत, शेअरची किंमत 25 ते 35 रुपयांदरम्यान दिसून आली.

जुलै 2023 पासून आयआरएफसीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. शेअरचा भाव 190 रुपयांच्या पुढे गेला होता. मात्र, काही दिवसांपासून या शेअरमध्ये घसरण सुरु आहे.

गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी शेअर 30 रुपयांपेक्षा कमी किंमतीवर होता, पण आता हा शेअर 150 रुपयांच्या पुढे गेला आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी एनएसईवर हा शेअर 153.75 रुपयांवर बंद झाला.

मागच्या 6 महिन्यांत आयआरएफसीच्या शेअर्सने 200% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एनएसईवर त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 192.80 रुपये आहे आणि बीएसईवर नीचांक 25.40 रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT