Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजारात काय होणार? इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

Share Market Investment Tips: शुक्रवारी जीडीपी डेटा जाहीर होण्याआधी बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 75.71 अंकांनी अर्थात 0.10 टक्क्यांनी वाढून 73,961.31 वर आणि निफ्टी 42 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी वाढून 22,530.70 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): शुक्रवारी जीडीपी डेटा जाहीर होण्याआधी बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 75.71 अंकांनी अर्थात 0.10 टक्क्यांनी वाढून 73,961.31 वर आणि निफ्टी 42 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी वाढून 22,530.70 वर बंद झाला. मागील आठवड्यात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 सुमारे 2 टक्क्यांनी घसरले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात एका रेंजमध्ये वर आणि खाली हालचाल होती असे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. गुंतवणूकदार निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत आहेत.

23,000च्या स्ट्राइकवर जास्तीत जास्त कॉल रायटिंग दिसत आहे, तर जास्तीत जास्त पुट रायटिंग 22,500 च्या स्ट्राइकवर दिसत आहे. येत्या काही दिवसांत निफ्टी 22.500 ते 23,000च्या दरम्यान राहू शकेल असा हा संकेत आहे. पण 22,500च्या खाली घसरल्याने निफ्टीमध्ये 22,000 पर्यंत करेक्शन होऊ शकते.

बँक निफ्टीमध्ये 21 दिवसांच्या एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज (EMA) मधून तीव्र रिकव्हरी पाहायला मिळाली. तो 49,000 च्या रझिस्टंस लेव्हलजवळ बंद झाला. आरएसआय हायर लोज आहे आणि तेजीच्या क्रॉसओव्हरकडे जात आहे. 21-दिवसांच्या EMA म्हणजेच 48500 च्या स्टॉप लॉससह बँक निफ्टीमध्ये घट झाल्यास खरेदीचा सल्ला दिला जाईल.

बँक निफ्टीसाठी, 48,500 वर मजबूत सपोर्ट आणि 49,200 वर पहिला रझिस्टंस दिसून येतो. जर बँक निफ्टीने डेली चार्टवर 49,200 चा रझिस्टंस ओलांडला तर तो लवकरच 50,000 ची पातळी पाहू शकेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • आयडिया (IDEA)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • लुपिन लिमिटेड (LUPIN)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT