Investment Tips  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील विक्रमी वाढ कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: गुरुवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले. निफ्टी 22,950 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 1,196.98 अंकांच्या अर्थात 1.61 टक्क्यांच्या वाढीसह 75,418.04 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): गुरुवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले. निफ्टी 22,950 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 1,196.98 अंकांच्या अर्थात 1.61 टक्क्यांच्या वाढीसह 75,418.04 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 369.90 अंकांच्या म्हणजेच 1.64 टक्क्यांच्या वाढीसह 22,967.70 वर बंद झाला.

गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.5 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.3 टक्क्यांनी वाढून बंद झाले , मेटल आणि फार्मा वगळता इतर सर्व सेक्टरल इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. ऑटो, बँक आणि कॅपिटल गुड्स प्रत्येकी 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

डेली चार्टवर निफ्टीने असेंडिंग ट्रायएंगल फॉर्मेशन ब्रेकआउट दिले आहे जे 23850 पातळीच्या अंदाजे टारगेटसह अपट्रेंड सुरू ठेवण्याचे लक्षण असल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे आदित्य गग्गर यांनी सांगितले. पण गुरुवारची तीव्र वाढ पाहता निफ्टीमध्ये पुलबॅक होण्याची शक्यता आहे. अशी घसरण झाल्यास, 22,780 ची पातळी निफ्टीसाठी तात्काळ सपोर्ट म्हणून काम करेल.

बाजारातील सध्याचा तेजीचा कल कायम राहील, असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांना वाटते. बँकिंग इंडेक्समधील तेजी आणखी वाढताना दिसेल. आता निफ्टी 23,100-23,400 च्या झोनमध्ये जाताना पाहू शकतो.

कोणत्याही पुलबॅकच्या बाबतीत, निफ्टीला तात्काळ सपोर्ट 22,600-22,800 च्या झोनमध्ये असेल. गुंतवणूकदारांनी यावेळी हेवीवेट स्टॉक्सवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेगमेंटमधील निवडक शेअर्सचा विचार करावा असा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • आयडिया (IDEA)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • ए यू बँक (AUBANK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT