Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजाराच्या रिकव्हरीत कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. रियल्टी, ऑइल-गॅस, मेटल आणि पॉवर इंडेक्समघध्ये सर्वाधिक वाढ झाली. ऑटो आणि कंझ्युमर गुड्सच्या शेअर्समध्येही खरेदी झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. रियल्टी, ऑइल-गॅस, मेटल आणि पॉवर इंडेक्समघध्ये सर्वाधिक वाढ झाली. ऑटो आणि कंझ्युमर गुड्सच्या शेअर्समध्येही खरेदी झाली. त्याच वेळी एफएमसीजी आणि फार्मा इंडेक्समध्ये विक्री दिसून आली.

व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 328 अंकांनी वधारला आणि 73,105 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 114 अंकांनी वाढून 22,218 वर बंद झाला. बँक निफ्टी 105 अंकांनी वाढून 47,859 वर बंद झाला. तर मिडकॅप 490 अंकांनी वाढून 50,225 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांबाबतच्या अंदाजांमुळे बाजारात अस्थिरता वाढल्याचे अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या अनिता गांधी म्हणाल्या. याशिवाय एफआयआयने केलेल्या विक्रीमुळे इंडेक्स घसरत आहेत. महागड्या व्हॅल्युएशनमुळे बाजारात प्रॉफिट बुकिंगही झाली. पण, एकदा की निफ्टी 50 इंडेक्स 22,000 च्या खाली गेला की पुन्हा खरेदी सुरू होईल.

लार्ज कॅप शेअर्सचे व्हॅल्युएशन योग्य दिसत असल्याचे स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना म्हणाले. यामुळे लार्ज कॅपमध्ये व्हॅल्यू बाईंगला प्रोत्साहन मिळत आहे. त्यांनी बेंचमार्क इंडेक्समध्ये वाढ होण्याचे श्रेय चांगले जागतिक संकेत आणि शॉर्ट पोझिशन्स कव्हर करणाऱ्या ट्रेडर्सना दिले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेक्टरमधील व्हॅल्युएशन महाग आहेत, ज्यामुळे काही सेगमेंट्समध्ये खराब कामगिरीचा धोका आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • ओएनजीसी (ONGC)

  • एल अँड टी (LT)

  • आयडीया (IDEA)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT