Investment Tips in marathi Which 10 shares perform today Sakal
Share Market

Share Market Today: जागतिक अस्थिरतेत आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्स गुरुवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले. निफ्टी 22,000 च्या खाली गेला आहे. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 454.69 अंकांनी अर्थात 0.62 टक्क्यांनी घसरून 72,488.99 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): भारतीय बेंचमार्क इंडेक्स गुरुवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले. निफ्टी 22,000 च्या खाली गेला आहे. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 454.69 अंकांनी अर्थात 0.62 टक्क्यांनी घसरून 72,488.99 वर आणि निफ्टी 152.10 अंकांनी म्हणजेच 0.69 टक्क्यांनी घसरून 21,995.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

साप्ताहिक एक्स्पायरीच्या दिवशी बरीच अस्थिरता दिसून आल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. सकाळच्या व्यवहारात बुल्सचे वर्चस्व दिसले पण दुपारनंतर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे निफ्टी 22,000 च्या खाली गेला.

निफ्टीने त्याचा 50 डीएमए आणि लाँग ट्रेंडलाइन सपोर्ट एका बियरिश इंगल्फिंग कँडलस्टिक पॅटर्नसह मोडला आहे, पण सध्या रायझिंग चॅनेलच्या खालच्या टोकाला दिसत आहे. बाजारातील सध्याचा कल कायम राहील की त्यात काही बदल होईल हे पुढील ट्रेडिंग सत्रामधून कळेल.

आज जागतिक बाजारातून अतिशय वाईट संकेत मिळत आहेत, निफ्टी जवळपास 350 अंकांनी घसरला आहे. जपानचा निक्केई 1000 अंकांनी घसरत आहे. क्रूडनेही उसळी घेतली आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • टायटन (TITAN)

  • ओएनजीसी (ONGC)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • लुपिन लिमिटेड (LUPIN)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT