Investment Tips in marathi Which 10 shares perform today Sakal
Share Market

Share Market Today: आज कोणत्या बँकिंग शेअर्समध्ये असणार तेजी? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: बँकिंग शेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स तेजीसह बंद झाले. निफ्टी 21,700 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 482.70 अंकांच्या अर्थात 0.68 टक्क्यांच्या वाढीसह 71,555.19 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बँकिंग शेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स तेजीसह बंद झाले. निफ्टी 21,700 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 482.70 अंकांच्या अर्थात 0.68 टक्क्यांच्या वाढीसह 71,555.19 वर बंद झाला आणि निफ्टी 127.30 अंकांच्या म्हणजेच 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 21,743.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजार सोमवारच्या घसरणीपासून मोठ्या प्रमाणात सावरल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. देशांतर्गत चलनवाढ कमी झाल्यामुळे सेंटीमेंट सुधारल्या आहेत.

ज्यामुळे ग्रामीण भागातील मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. असे असूनही, उच्च मूल्यांकनामुळे, लहान-मध्यम शेअर्सची कामगिरी लार्ज कॅप्सच्या तुलनेत कमकुवत राहिली. अमेरिकन चलनवाढीच्या आकडेवारीपुढे गुंतवणूकदार सावध दिसत आहेत.

बँक निफ्टी 46,000 च्या वर जाऊन ताकद दाखवत नाही तोपर्यंत तो रेंज बाउंड राहण्याची शक्यता असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. आयसीआयसीआय बँकेशिवाय इतर खासगी बँकांच्या कामगिरीचा येत्या काळात इंडेक्सवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. बँक निफ्टी 44,600 च्या आसपास दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT