Investment Tips in marathi  Sakal
Share Market

Share Market Today: आज कोणते शेअर्स देतील दमदार परतावा? 'या' कंपन्यांचे शेअर्स ठेवा यादीत

Share Market Investment Tips: मंगळवारी अस्थिर सत्रात भारतीय बाजार जवळजवळ सपाट बंद झाले. निफ्टी 22,500 च्या वर राहण्यात यशस्वी झाला. बाजार बंद असताना सेन्सेक्स 52.63 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरून 73,953.31 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): मंगळवारी अस्थिर सत्रात भारतीय बाजार जवळजवळ सपाट बंद झाले. निफ्टी 22,500 च्या वर राहण्यात यशस्वी झाला. बाजार बंद असताना सेन्सेक्स 52.63 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरून 73,953.31 वर बंद झाला. निफ्टी 27 अंकांनी अर्थात 0.12 टक्क्यांनी वाढून 22,529 वर बंद झाला. पहिल्या फर्स्ट हाफमध्ये घसरण झाल्याने निफ्टी 22,500 च्या खाली घसरला. पण, मेटल, पॉवर, ऑइल अँड गॅस, पीएसयू बँकांमध्ये झालेल्या खरेदीमुळे सेकंड हाफमध्ये नुकसान भरून निघाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे आदित्य गग्गर म्हणाले. इंडेक्सने डेली चार्टवर बुलिश एनगल्फिंग कँडल तयार केली आहे. हा पॅटर्न खालच्या स्तरावर खरेदीदारांची उपस्थिती दर्शवतो. इंडेक्सने 22,600 ची पातळी तोडली की, तो त्याच्या पूर्वीच्या 22,790 च्या उच्च पातळीवर आणखी वाढीची अपेक्षा करू शकतो. जर इंडेक्स घसरला तर त्याला 22,400 वर सपोर्ट मिळेल असे दिसते.

बँक निफ्टीही एका मर्यादित रेंजमध्ये कंसोलिडेट झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. तो 150 अंकांच्या घसरणीसह नकारात्मक पातळीवर बंद झाला. एकूणच तेजीच्या ट्रेंडमध्ये हा थोडा विराम असल्याचे गेडिया म्हणाले. शॉर्ट टर्ममध्ये बँक निफ्टी 48320 - 48700 पर्यंत पोहोचेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. आवर्ली मोमेंटम इंडिकेटरमध्ये नकारात्मक क्रॉसओव्हर आहे जो प्राइस ऍक्शनचे कारण बनू शकते. मात्र, अजूनही ट्रेंड रिव्हर्स होण्याची चिन्हे नाहीत.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • टाटा स्टील(TATASTEEL)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • आयडीया (IDEA)

  • एम फॅसिस (MPHASIS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT