Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्या यादीत ठेवा हे 10 शेअर्स; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips (Top Shares): भारतीय बेंचमार्क इंडेक्सच्या सलग पाच दिवसांच्या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. 2 ऑगस्टला निफ्टी 24750 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 885.60 अंकांनी अर्थात 1.08 टक्क्यांनी घसरून 80,981.95 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्सच्या सलग पाच दिवसांच्या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. 2 ऑगस्टला निफ्टी 24750 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 885.60 अंकांनी अर्थात 1.08 टक्क्यांनी घसरून 80,981.95 वर बंद झाला आणि निफ्टी 293.20 अंकांनी म्हणजेच 1.17 टक्क्यांनी घसरून 24,717.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची शुक्रवारी घसरणीसह सुरुवात झाली आणि दिवसभर तो कमजोर राहिल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. शेवटी तो 293 अंकांनी घसरला. डेली चार्टवर, निफ्टी गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमधील नीचांकी पातळीवर बंद झाला.

हे एक ब्रेकआउट अपयश आहे कारण निफ्टीला वरील स्तरांवर खरेदीत रस नाही. निफ्टी 24600 - 24550 च्या दिशेने परत जाण्याची शक्यता आहे जिथे त्याची 20 डे मूव्हिंग एव्हरेज आणि 38.2% फिबोनाची रिट्रेसमेंट लेव्हल सपोर्ट म्हणून काम करत आहे. वरच्या बाजुला 24820 –24850 वर रझिस्टंस दिसत आहे.

बँक निफ्टी शुक्रवारी 40 डे मूव्हिंग एव्हरेजच्या (51318) कंसोलिडेट झाला. त्यामुळेच निफ्टीपेक्षा कमी घसरण झाली. बँक निफ्टीची कामगिरी खराब राहिली आहे आणि भविष्यातही हीच स्थिती कायम राहील अशी शक्यता आहे.

बँक निफ्टीने विकली चार्टवर इनसाईड बार पॅटर्न तयार केला आहे. 52550 – 50440 ही पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टीसाठी महत्त्वाची पातळी असेल. रेंज ब्रेकआउट इथून पुढील ट्रेंड निश्चित करेल. बँक निफ्टी एका रेंजमध्ये फिरताना दिसू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • मारुती (MARUTI)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Dombivali News : दिवा स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लावा; मनसे नेते राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

SCROLL FOR NEXT