Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजारात जोरदार वाढ झाल्यानंतर प्रॉफिट बुकींग दिसून आले. त्यामुळे बाजार वरच्या स्तरावरून घसरला आणि बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवरही दबाव दिसून आला. इन्फ्रा, रियल्टी, ऑईल आणि गॅस शेअर्समध्ये विक्री झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): शुक्रवारी बाजारात जोरदार वाढ झाल्यानंतर प्रॉफिट बुकींग दिसून आले. त्यामुळे बाजार वरच्या स्तरावरून घसरला आणि बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवरही दबाव दिसून आला. इन्फ्रा, रियल्टी, ऑईल आणि गॅस शेअर्समध्ये विक्री झाली.

आयटी, ऑटो आणि बँकिंग शेअर्सवरही दबाव दिसला. पण पीएसई आणि फार्मा इंडेक्स वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 733 अंकांनी घसरला आणि 73,878 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 172 अंकांनी घसरून 22,476 वर बंद झाला. तर बँक निफ्टी 308 अंकांनी घसरून 48,924 वर बंद झाला. मिडकॅप 180 अंकांनी घसरून 50,935 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजारात पुन्हा एकदा प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. शुक्रवारचा दिवस बाजारात जवळपास एक टक्का घसरणीने संपला. भक्कम जागतिक संकेतांच्या आधारे सकारात्मक सुरुवात करूनही, आघाडीच्या शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाल्यामुळे बाजारातील सुरुवातीचा नफा गमावला आणि निफ्टी लाल रंगात गेला.

शेवटी निफ्टी 0.85 टक्क्यांच्या घसरणीसह 22,456.65 अंकांच्या आसपास बंद झाला. ऑटो, आयटी आणि रियल्टी या मोठ्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला. याशिवाय ब्रॉडर इंडेक्समध्येही सुमारे 0.50 टक्क्यांची घसरण दिसून आली.

इंडेक्समध्ये झालेल्या तीव्र घसरणीने गेल्या चार सत्रांतील नफ्यावर परिणाम झाला. निफ्टीने त्याच्या शॉर्ट टर्म मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच 20 डीईएमएचा सपोर्ट राखण्यात यश मिळवले. अशा परिस्थितीत, निवडक शेअर्सचा विचार करा असा सल्ला त्यांनी दिला.

जर निफ्टी 22,400 चा सपोर्ट राखण्यात अपयशी ठरला तर हेजिंग धोरण स्वीकारले पाहिजे. देशांतर्गत कारणांव्यतिरिक्त, ट्रेडर्सनी अमेरिकन बाजारांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एल अँड टी (LT)

  • मारुती (MARUTI)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एमआरएफ (MRF)

  • भारतफोर्ज (BHARATFORG)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT