Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत; आज कसा असेल शेअर बाजार?

Share Market Investment Tips (Top Shares): सोमवारी शेअर बाजारातील विक्रमी वाढ सलग दुसऱ्या सत्रात सुरू राहिली आणि आयटी वगळता सर्व सेक्टर्समधील खरेदीमुळे निफ्टीने नवीन उच्चांक गाठला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 145.52 अंकांनी अर्थात 0.18 टक्क्यांनी वाढून 80,664.86 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी शेअर बाजारातील विक्रमी वाढ सलग दुसऱ्या सत्रात सुरू राहिली आणि आयटी वगळता सर्व सेक्टर्समधील खरेदीमुळे निफ्टीने नवीन उच्चांक गाठला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 145.52 अंकांनी अर्थात 0.18 टक्क्यांनी वाढून 80,664.86 वर बंद झाला आणि निफ्टी 84.55 अंकांनी म्हणजेच 0.35 टक्क्यांनी वाढून 24,586.70 वर बंद झाला.

निफ्टीने पहिल्यांदाच 24,600 ची पातळी ओलांडली आणि 24,635.05 चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला, तर बीएसई सेन्सेक्स 80,893.51 च्या विक्रमी पातळीच्या जवळ आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सोमवारी आयटी वगळता इतर सर्व सेक्टर्स तेजीसह बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. पीएसयू बँका सर्वात जास्त वाढल्या आणि त्या खालोखाल मीडिया शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

मिड आणि स्मॉल कॅप्स 0.50 टक्क्यांहून अधिक वाढले. त्यांनी फ्रंटलाइन इंडेक्सला मागे टाकले. पण मजबूत अपट्रेंड लक्षात घेता, त्यात करेक्शन आले तरी त्यात खरेदीची संधी सोडू नका असेही ते म्हणाले. निफ्टीला 24,400 वर सपोर्ट आणि 24,740 वर रेझिस्टन्स दिसत आहे.

निफ्टीची सुरुवात हिरव्या रंगात झाली आणि दिवसभर तो साइडवेज राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रूपक डे म्हणाले. सोमवारी डेली चार्टवर डोजी पॅटर्न तयार झाला आहे, जो बाजारातील अनिश्चितता दर्शवतो.

24,250 च्या खाली घसरण नजीकच्या भविष्यात बाजारात भीती निर्माण करू शकते. 24,250 च्या खाली घसरल्यास इंडेक्स 24,200-24,180 पर्यंत पोहोचू शकतो. वरच्या टोकाला 24,650 च्या पातळीवर रझिस्टन्स दिसत आहे. हा रझिस्टन्स ओलांडला की बाजारात आणखी वाढ शक्य आहे.

जागतिक संकेत कसे आहेत?

सकाळी 7 च्या सुमारास गिफ्ट निफ्टी 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 24,630 च्या वर व्यवहार करताना दिसला. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी चलनवाढीची चिंता कायम असतानाही दर कपात लवकरच होऊ शकते, असे सुचविल्याने सोमवारी अमेरिकन बाजार वाढले.

डाऊ जोन्स 0.53 टक्क्यांच्या वाढीसह नवीन विक्रमी पातळीवर बंद झाला, तर नॅस्डॅक 0.40 टक्क्यांनी वाढून नवीन इंट्राडे उच्च पातळीवर बंद झाला. S&P 500 देखील 0.28 टक्क्यांनी वाढले.

आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आला. ऑस्ट्रेलियाचा ASX200 0.08 टक्क्यांनी घसरला, तर कोरियाचा कोस्पी 0.07 टक्क्यांनी वधारला. जपानचा निक्केई 0.71 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. युरोपीय बाजारांनी घसरण नोंदवली. जर्मनीचा DAX 0.84 टक्क्यांनी घसरला, तर UK चा FTSE 0.85 टक्क्यांनी घसरला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • आयडिया (IDEA)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • लुपिन लिमिटेड (LUPIN)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT