Investment Tips in marathi  Sakal
Share Market

Share Market Today: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत; गिफ्ट निफ्टीचा 22,500चा विक्रम, आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: शनिवारी 2 मार्चला भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी मार्केटमध्ये 'स्पेशल ट्रेडिंग सेशन'ची एकूण 2 सेशन्स झाली. दोन्ही सत्रांच्या शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 60 अंकांनी वाढून बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): शनिवारी 2 मार्चला भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी मार्केटमध्ये 'स्पेशल ट्रेडिंग सेशन'ची एकूण 2 सेशन्स झाली. दोन्ही सत्रांच्या शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 60 अंकांनी वाढून बंद झाला.

तर निफ्टी 22,350 च्या वर गेला. ब्रॉडर मार्केटमध्येही जोरदार खरेदी झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.81 लाख कोटींची वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स अनुक्रमे 0.67% आणि 0.70% च्या वाढीसह बंद झाले.

यापूर्वी व्यवहारादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीने त्यांच्या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला होता. सेन्सेक्सने 73,860.12 अंकांची विक्रमी पातळी गाठली. तर एनएसई निफ्टीने 22,395 अंकांचा नवीन उच्चांक गाठला.

शेअर बाजारात शनिवारी सकाळी 9.15 ते 10 या वेळेत 'प्रायमरी साइट'वर पहिले सेशन आणि 'डिझास्टर रिकव्हरी' वर दुसरे सेशन सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत पार पडले.

ट्रेडिंग संपल्यावर, बीएसई सेन्सेक्स 60.80 अंकांनी अर्थात 0.08% वाढून 73,806.15 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 39.65 अंकांच्या अर्थात 0.18% च्या वाढीसह 22,378.40 वर बंद झाला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • एम फॅसिस (MPHASIS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT