Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजारात कमाईची मोठी संधी; इंट्राडेसाठी तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: शुक्रवारी सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 22,000 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 376.26 अंकांच्या अर्थात 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 72,426.64 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 22,000 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 376.26 अंकांच्या अर्थात 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 72,426.64 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 129.90 अंकांच्या म्हणजेच 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 22,040.70 वर बंद झाला.

जागतिक बाजारात कोणतीही मोठी करेक्शन होण्याची शक्यता नसल्याने ही तेजी कायम राहील, असा विश्वास रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी व्यक्त केला आहे. निफ्टीचे पुढील लक्ष्य 21,750 वर तर सपोर्ट 22,150 वर आहे. जर खासगी बँकांच्या शेअर्सची कामगिरी चांगली राहिली, तर बाजार तेजीत राहील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

लार्ज-कॅप शेअर्ससाठी वाढलेल्या खरेदीमुळे निफ्टी अलीकडील कंसोलिडेशनच्या टप्प्यातून बाहेर आल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले.

शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 22,200 च्या दिशेने जाऊ शकतो. जर तो 22,200 च्या वर गेला तर 22,600 पर्यंत वाढू शकतो. त्याच वेळी, 22,750 च्या पातळीवर खालच्या टोकाला सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • विप्रो (WIPRO)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • एचडीएफसी ऍसेट मॅने (HDFCAMC)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT