Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: विप्रो, बजाज ऑटोसह 'या' 10 शेअर्समध्ये करा गुंतवणूक; ब्रोकरेजचा सल्ला

Share Market Investment Tips: शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात वाढ दिसून आली. निफ्टी 21,300 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 241.86 अंकांच्या अर्थात 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 71,106.96 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात वाढ दिसून आली. निफ्टी 21,300 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 241.86 अंकांच्या अर्थात 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 71,106.96 वर बंद झाला आणि निफ्टी 94.40 अंकांच्या म्हणजेच 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 21,349.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टी इंडेक्सला शेवटच्या दिवशी विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला, पण तो 47400 ची सपोर्ट लेव्हल राखण्यात यशस्वी झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले.

जर बँक निफ्टी या सपोर्टच्यावर टिकून राहण्यात अपयशी ठरला तर तो 47100 च्या पातळीवर आणखी घसरू शकतो. वरच्या बाजूला, निफ्टीसाठी 47700 वर रझिस्टंस आहे. बँक निफ्टीने हा रझिस्टंस पार केल्यास शॉर्ट कव्हरिंग सुरू होऊ शकते. त्यामुळे इंडेक्स 48000/48200 च्या पातळीपर्यंत वाढू शकतो.

मागच्या दोन सत्रांमधील वाढीमुळे इंडेक्सवरचा दबाव कमी झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. आता जर निफ्टीने सध्याच्या पातळीभोवती थोडा वेळ घालवला तर ते एक हेल्दी कंसोलीडेशन असेल. सध्या सर्वच सेक्टर्समध्ये अस्थिरता दिसत आहे. अशा परिस्थितीत स्टॉक निवडताना जास्त काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • विप्रो (WIPRO)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • कोफोर्ज (COFORGE)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT