Finance News  google
Share Market

Finance News : अपडेटर सर्व्हिसेजचा आयपीओ, सेबीकडे कागदपत्र दाखल...

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार, या आयपीओअंतर्गत 400 कोटी रुपयांपर्यंतचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : इंटीग्रेटेड फॅसिलिटीज मॅनेजमेंट अपडेटर सर्व्हिसेज लिमिटेड (Integrated Facilities Management Updater Services Limited - UDS) लवकरच आयपीओ आणणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार, या आयपीओअंतर्गत 400 कोटी रुपयांपर्यंतचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, कंपनीच्या प्रमोटर्स आणि विद्यमान भागधारकांद्वारे ऑफर फॉर सेलअंतर्गत (OFS) 1.33 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल.  हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर?? (IPO of Updater Services, documents filed with SEBI... )

ओएफएसअंतर्गत समभागांच्या विक्रेत्यांमध्ये टांगी फॅसिलिटी सॉल्यूशंस प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया बिझनेस एक्सलंस फंड- II आणि इंडिया बिझनेस एक्सलंस फंड IIA यांचा समावेश आहे. तसेच, कंपनी 80 कोटी रुपयांपर्यंतच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचा विचार करू शकते.

आयपीओतून मिळालेली रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल. याव्यतिरिक्त वर्किंग कॅपिटल फंडींगसाठी, इनऑर्गॅनिक इनिशिएटीव्ह आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी ही रक्कम वापरली जाईल.

कंपनी आपल्या ग्राहकांना इंटीग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेज आणि बिझनेस सपोर्ट सर्व्हिस देते. कंपनी एफएमसीजी, मॅन्युफॅक्चरिंग आणइ इंजीनिअरिंग, बीएफएसआय, हेल्थकेअर, IT/ITes, ऑटोमोबाईल्स, लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग, एअरपोर्ट्स, पोर्ट्स, इन्फ्रास्ट्रक्टर आणि रिटेल यासारख्या क्षेत्रांमध्ये ग्राहकांना सेवा देते.

आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड त्यांचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT