ipo sakal
Share Market

J.G. Chemicals IPO : जेजी केमिकल्सचा आयपीओ येणार, दोनशे कोटींचे फ्रेश शेअर्स होणार जारी

या आयपीओअंतर्गत 202.50 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील.

शिल्पा गुजर

जेजी केमिकल्स लिमिटेड (JG chemicals ltd) या झिंक ऑक्साईड उत्पादक कंपनीचा आयपीओ येणार आहे. आयपीओसाठी कंपनीला बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने 4 जानेवारी 2023 रोजी सेबीकडे पेपर दाखल केले. या आयपीओ अंतर्गत 202.50 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील.

याशिवाय, ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनीचे विद्यमान भागधारक आणि प्रमोटर्सकडून 57 लाखांपर्यंत इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ऑफर केले जातील. (JG Chemicals IPO coming soon Sebi granted share market news)

ऑफर फॉर सेलचा भाग म्हणून, व्हिजन प्रोजेक्ट्स आणि फिनव्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे 36.4 लाख इक्विटी शेअर्स विकले जातील. याशिवाय, जयंती कमर्शियल लिमिटेड 1.4 लाख इक्विटी शेअर्स, सुरेश कुमार झुनझुनवाला (HUF) 12.7 लाख इक्विटी शेअर्स आणि अनिरुद्ध झुनझुनवाला (HUF) 6.5 लाख इक्विटी शेअर्स विकणार आहेत.

कंपनी मर्चंट बँकर्सशी सल्लामसलत करून या आयपीओवर 40 कोटीपर्यंत खासगी प्लेसमेंटचा विचार करू शकते. जर हे प्लेसमेंट पूर्ण झाले, तर नव्या आयपीओची साईज कमी केली जाईल.

जेजी केमिकल्स लिमिटेडची स्थापना 2001 मध्ये सुरेश झुनझुनवाला यांनी केली होती. उत्पादन आणि कमाईच्या बाबतीत ही भारतातील सर्वात मोठी झिंक ऑक्साईड उत्पादक आहे. गेल्या तीन वर्षांत, त्याने 10 पेक्षा जास्त देशांमध्ये 200 हून अधिक देशांतर्गत ग्राहकांना आणि 50 हून अधिक जागतिक ग्राहकांना आपले प्रॉडक्ट्स विकले आहेत. टायर उद्योग हा त्याच्या उत्पादनांचा सर्वात मोठा ग्राहक आहे.

कंपनी केअर (CARE) अहवालानुसार टॉप 10 जागतिक टायर उत्पादकांपैकी 9 आणि भारतातील टॉप 11 टायर कंपन्यांपैकी 9 कंपन्यांना आपले प्रॉ़क्ट्स पुरवते. शिवाय भारतातील आघाडीच्या पेंट मॅन्युफॅक्चरर, फुटवेअर प्लेयर्स आणि कॉस्मेटिक कंपन्यांना उत्पादनांचा पुरवठा करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT