Jio Financial Services hits Rs 2 lakh crore market cap RIL touches fresh record high Sakal
Share Market

Jio Financial Services: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने रचला नवा इतिहास! मार्केट कॅपमध्ये तुफान वाढ

Jio Financial Services Record High: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर आज 12 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. आज कंपनीने नवीन उंची गाठली आहे आणि प्रथमच कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

राहुल शेळके

Jio Financial Services Record High: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर आज 12 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. आज कंपनीने नवीन उंची गाठली आहे आणि प्रथमच कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. Jio Financeचे मार्केट कॅप 2.16 लाख कोटी रुपये झाले आहे.

जिओ फायनान्सच्या शेअरने 347 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे आणि ही या शेअरची सर्वकालीन उच्च पातळी आहे. जिओ फायनान्स 21 ऑगस्ट 2024 रोजी शेअर बाजारात लिस्ट झाली होती. (Jio Financial Services hits Rs 2 lakh crore market cap RIL touches fresh record high)

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा निव्वळ नफा 293 कोटी रुपयांवर घसरला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 668 कोटी रुपयांचा नफा झाला होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 269 कोटी रुपये होते. (Jio Financial market cap crosses Rs 2 trillion)

Jio Financial Services ने यापूर्वी जागतिक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी BlackRock सोबत संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, दोन्ही कंपन्यांनी भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल केली.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखले जात होते. ते रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळे झाले आणि 21 ऑगस्ट रोजी स्वतंत्र संस्था म्हणून लिस्ट झाली.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरनेही आज नवा उच्चांक गाठला असून या शेअरमध्ये 2988.80 रुपयांची ऐतिहासिक पातळी दिसून आली. हा शेअर आज 2979 रुपयांवर उघडला आणि नंतर वाढून 2988.80 रुपयांच्या नवीन शिखरावर पोहोचला.

या तेजीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 20 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. RIL चे मार्केट कॅप 20.13 लाख कोटी रुपये झाले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT