L and T secures civil work project of Bhogapuram airport from GMR group  Sakal
Share Market

L&T Share Price: एल अँड टीला आंध्र प्रदेशात मिळाली मोठी ऑर्डर; शेअरवर ठेवा लक्ष, एका वर्षात दिला 47% परतावा

L&T Share Price: लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना कायमच दमदार परतावा दिला आहे.

राहुल शेळके

L&T Share Price: लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना कायमच दमदार परतावा दिला आहे. हा शेअर एका वर्षात स्टॉक 47 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर मागच्या 6 महिन्यांत हा स्टॉक 26 टक्क्यांनी वाढला आहे.

या वर्षी आतापर्यंत शेअर 42 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. आता आणखी एक कारण या शेअरमध्ये तेजी येण्याचे, ते म्हणजे त्यांना एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.

लार्सन अँड टुब्रोची (LT) शाखा, एल अँड टी कंस्ट्रक्शनला (L&T Construction) आंध्र प्रदेशातील नवीन भोगापुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने नुकतीच याबाबत माहिती दिली.

कंपनीने ऑर्डरची व्हॅल्यू उघड केलेली नाही. पण या ऑर्डरचे मूल्य अंदाजे 2,500 ते 5,000 कोटीच्या दरम्यान असू शकते असे कळत आहे.

एल अँड टीने एका निवेदनात म्हटले आहे की हा प्रोजेक्ट सुरुवातीला वार्षिक 60 लाख प्रवाशांची क्षमता हाताळण्यासाठी विकसित केला जाईल, जो नंतर प्रतिवर्षी 1.2 कोटी प्रवाशांपर्यंत वाढवला जाईल.

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग आणि फॅक्टरी आणि ट्रान्सपोर्ट इन्फ्रा बिझनेसने जीएमआर विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडकडून इंजिनीअरिंग, खरेदी आणि विमानतळ प्रकल्पाच्या बांधकामासाठी एक मोठा प्रकल्प मिळवला आहे. लार्सन अँड टुब्रो सध्या दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि नवी मुंबईच्या प्रमुख विमानतळांचे बांधकाम करत आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT