Lemon Tree Hotels Share Sakal
Share Market

Lemon Tree Hotels: लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Lemon Tree Hotels Share: लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्समध्ये मंगळवारी 7 टक्क्यांची वाढ झाली.

राहुल शेळके

Lemon Tree Hotels Share: लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्समध्ये मंगळवारी 7 टक्क्यांची तेजी दिसून आली. या शेअरने इंट्राडेमध्ये 125.15 रुपयांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. हा शेअर 0.69 टक्क्यांनी वाढून 117.50 रुपयांवर बंद झाला.

कंपनीने 6 सप्टेंबरला लेमन ट्री हॉटेल मशोबरा, शिमलाबाबत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर, गेल्या 4 दिवसांमध्ये हा स्टॉक सुमारे 15 टक्क्यांनी वाढला आहे.

2026 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत हे हॉटेल सुरु होण्याची आशा आहे. याचे व्यवस्थापन कार्नेशन हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड आणि लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केले जाईल. हा काँट्रॅक्ट मशोबरा येथील अलिव्हिया हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेससोबत करण्यात आला आहे.

कंपनीची 2 हॉटेल्स असून आगामी काळात त्यांची संख्या 6 पर्यंत वाढणार आहे. यापूर्वी 21 ऑगस्टला लेमन ट्री हॉटेल्सने घोषणा केली होती की कंपनीने भुवनेश्वर आणि कसोली येथील दोन मालमत्तांसाठी करार केला आहे. लेमन ट्री हॉटेल्सचा आउटलूक हेल्दी ऑक्यपन्सी रेट्स आणि हायर एव्हरेज रुमसह (ARR) आशादायक आहे.

गेल्या एका महिन्यात लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 56 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत शेअर्स 40 टक्के वाढले आहेत. गेल्या एका वर्षात हा शेअर 43 टक्क्यांनी वाढला आहे. एवढेच नाही तर गेल्या तीन वर्षांत 315 टक्के इतका चांगला नफा कमावला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT