Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Today: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी बाजार कसा असेल? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: सोमवारी एक्झिट पोलच्या निकालांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवल्यानंतर निफ्टी 23,250 च्या वर गेल्याने भारतीय शेअर बाजार मजबूत राहिला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): सोमवारी एक्झिट पोलच्या निकालांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवल्यानंतर निफ्टी 23,250 च्या वर गेल्याने भारतीय शेअर बाजार मजबूत राहिला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 2,507.47 अंकांनी अर्थात 3.39 टक्क्यांनी वाढून 76,468.78 वर आणि निफ्टी 733.20 अंकांनी म्हणजेच 3.25 टक्क्यांनी वाढून 23,263.90 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारतीय शेअर बाजाराने जून महिन्याची जोरदार सुरुवात 23,338 या नवीन उच्चांकासह केली. यानंतर, निफ्टी 733.20 अंकांच्या वाढीसह 23,263.90 वर बंद झाला आणि दिवसभर एका रेंजमध्ये चढ-उतार झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले.

सर्व सेक्टरल इंडेक्स निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. यामध्येही पीएसयू बँक आणि एनर्जी इंडेक्सने सर्वोत्तम कामगिरी केली. ब्रॉडर मार्केटमध्ये संमिश्र कल दिसून आला.

मिडकॅप्स आघाडीवर असलेल्या निर्देशांकांसोबत कमी-अधिक प्रमाणात उच्च पातळीवर बंद झाले. तर स्मॉलकॅपने खराब कामगिरी केली आहे. हे ट्रेंड रिव्हर्सलचे लक्षण आहे. पण अल्पावधीत सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल बाजाराच्या कलांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळते.

निफ्टी अल्पावधीत 23500 - 23740 पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. निफ्टीने वाढीसह सुरुवात केली आणि सकारात्मक ट्रेंडसह एकत्र आले आणि 733 अंकांच्या वाढीसह बंद झाला. डेली चार्टवर, निफ्टी 23110 च्या पूर्वीच्या स्विंग हायच्या वर गेला आहे. हे तेजीच्या पुढील टप्प्याच्या सुरुवातीचे संकेत देते. अल्पावधीत निफ्टी 23500 - 23740 वर जाताना दिसू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • एनटीपीसी (NTPC)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • ओएनजीसी (ONGC)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • एटडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Paithan News : केकत जळगावमध्ये ग्रामस्थांची सतर्कता कामी आली; महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला!

Jalgaon News : थंडीचा कडाका अन् मेथीच्या लाडूंचा तडका! जळगावात घराघरांत दरवळला पारंपरिक स्वाद

IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल

SCROLL FOR NEXT