Macrotech Developers soars 6 percent on Jefferies buy call, higher target Sakal
Share Market

Stock In News: रिअल इस्टेट कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर; काय आहे कारण?

Macrotech Developers Share: रिअल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. नुकताच हा शेअर 8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या (Macrotech Developers) शेअर्सला 'बाय' रेटिंग दिले आहे.

राहुल शेळके

Macrotech Developers Share: रिअल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. नुकताच हा शेअर 8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या (Macrotech Developers) शेअर्सला 'बाय' रेटिंग दिले आहे.

यामुळे शेअरमध्ये पॉझिटीव्ह सेंटिमेंट निर्माण झाला आणि मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली. शुक्रवारी बीएसईवर शेअरने 1225 रुपयांचा उच्चांक गाठला. स्टॉकसाठी हा 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे. व्यवहाराच्या शेवटी हा शेअर सुमारे 7 टक्क्यांच्या वाढीसह 1208.40 रुपयांवर राहिला.

मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या शेअर्सची अप्पर प्राइस बँड 1,356.30 रुपये आहे, त्यात 20% वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 120 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तीन वर्षांत जमिनीचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळेच मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या स्टॉकमध्ये वाढ अपेक्षित आहे.

ब्रोकरेजने स्टॉकचे टारगेट 884 रुपयांवरून 1290 रुपये केले आहे. हे टारगेट सध्याच्या किंमतीपेक्षा 14 टक्क्यांनी जास्त आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुरु झाल्याने मुंबई शहरातील कनेक्टिव्हिटी वाढेल, ज्याचा फायदा मॅक्रोटेक डेव्हलपर्सना होईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT