Mahindra Lifespace Developers
Mahindra Lifespace Developers esakal
Share Market

Mahindra Lifespace Developers : या रियल इस्टेट स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालमाल

सकाळ डिजिटल टीम

Mahindra Lifespace Developers : महिंद्रा ग्रुपची रिअल इस्टेट कंपनी महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सचे शेअर्स (Mahindra Lifespace Developers) बाजार कमजोर असतानाही चांगले परफॉर्म करत आहे. या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कधीही निराश केलेले नाही. लाँग टर्ममध्ये तर त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. आता, कंपनीच्या नवीन एमडी-सीईओच्या नेतृत्वाखाली शेअर मार्केट एक्सपर्ट्सना यात तेजीचा कल दिसत आहे. महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सचे शेअर्स सध्या 4.82 टक्क्यांनी वाढून 382.45 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीज सध्या महिन्द्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स स्टॉकबाबत पॉझिटीव्ह आहेत. एमडी आणि सीईओ अमित कुमार सिन्हा यांच्या राजीनाम्यानंतर अरविंद सुब्रमण्यन हे पद स्वीकारणार आहेत. नवीन सीईओला कॅपिटल ऍलॉकेशनचे स्वातंत्र्य असेल असे महिंद्रा ग्रुपचे सीईओ आणि एमडी डॉ. अनीस शाह यांनी म्हटले.

महिंद्रा लाइफस्पेसचा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. 30 जून 2000 रोजी हा शेअर केवळ 3.11 रुपयांवर होता. आता हा शेअर 382.45 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच गुंतवणूकदार 81300 रुपयांच्या गुंतवणुकीवर 23 वर्षांपेक्षा कमी कालावधीत कोट्यधीश झाले.

गेल्या वर्षी 7 मार्च 2022 रोजी त्याची किंमत 276 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, पुढील सहा महिन्यांत तो 554.55 रुपयांवर पोहोचला, जो एका वर्षातील उच्चांक आहे. शेअर्सची ही तेजी तुर्तास थांबली आहे, पण येत्या काळात या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त होत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT