Trading Scam Thane Sakal
Share Market

Trading Scam: बँक खात्यांपाठोपाठ डिमॅट खात्यावरही वाईट नजर; 1.26 कोटी रुपयांच्या शेअर्सची फसवणूक

Trading Scam Thane: राज्यात फसवणुकीचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीचे डिमॅट खाते हॅक करून 1 कोटी 26 लाख रुपयांचे शेअर्स चोरून विकण्यात आले आहेत.

राहुल शेळके

Trading Scam Thane: राज्यात फसवणुकीचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीचे डिमॅट खाते हॅक करून 1 कोटी 26 लाख रुपयांचे शेअर्स चोरून विकण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेने ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, कोणीतरी त्यांचे डीमॅट खाते हॅक केले आणि 1.26 कोटी रुपयांचे शेअर्स चोरले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेअर्सची चोरी जानेवारी 2017 ते डिसेंबर 2018 दरम्यान झाली होती. मात्र, त्या व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधण्यास एवढा वेळ का लागला याचे कोणतेही कारण दिले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

डोंबिवली परिसरातील मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोणीतरी तक्रारदाराच्या नावाने त्याच्या बनावट आयडीचा वापर करून बँक खाते उघडले.'

यानंतर, आरोपींनी बेकायदेशीरपणे तक्रारदाराच्या डिमॅट खात्यात प्रवेश केला आणि एका प्रसिद्ध पेंट कंपनीचे 9,210 शेअर्स विकले, ज्याची किंमत त्यावेळी 1.26 कोटी रुपये होती. विक्रीतून मिळालेली रक्कम बनावट बँक खात्यात जमा करण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आठवडाभरापूर्वीही फसवणूक झाली होती

आठवडाभरापूर्वीच ठाण्यात एका वृद्ध व्यावसायिकाची 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली होती. गेम झोनमध्ये लहान मुलांसाठी मशीन पुरवण्याच्या नावाखाली एका 69 वर्षीय व्यावसायिकाची 20 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली.

व्यापारी वीरधवल घाग यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी फर्म चालवणाऱ्या आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 406 (विश्वासाचा भंग) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT