man industries stock rises more than 8 percent and hits 52 week high  Sakal
Share Market

Man Industries: मॅन इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, काय आहे कारण?

Man Industries: जून 2023 मध्ये कंपनीने 11.88 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

राहुल शेळके

Man Industries: मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडचे (Man Industries (India) Ltd) शेअर्स सध्या खूप चांगली कामगिरी करत आहेत. नुकताच हा शेअर 8.5 टक्क्यांपर्यंत वाढला आणि 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. याचे कारण कंपनीला 380 कोटीच्या नवीन ऑर्डर्स मिळल्या आहेत.

सध्या कंपनीकडे अनएक्झिक्युटेड ऑर्डर बुक सुमारे 1,400 कोटी रुपयांची आहे, जी सहा महिन्यांत एक्झिक्युट होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, कंपनीला घरगुती ग्राहकाकडून विविध प्रकारच्या पाईप्ससाठी सुमारे 400 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती.

मॅन इंडस्ट्रीजच्या (इंडिया) संचालक मंडळाची 8 नोव्हेंबरला बैठक होणार आहे आणि 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी कंपनीच्या आर्थिक निकालांवर विचार आणि मान्यता देण्यात येणार आहे. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 11.88 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 10.50 कोटी रुपयांच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढला आहे.

मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड ही मॅन ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. मॅन ग्रुप विविध व्यवसायात आहे. मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडची स्थापना 1988 मध्ये झाली.

त्याच्या मुख्य व्यवसायांमध्ये लार्ज डायमीटरच्या कार्बन स्टील पाईप्सचे मॅन्युफॅक्चरिंग आणि कोटिंग, इंफ्रास्ट्रक्चर, रियल्टी आणि ट्रेडिंग यांचा समावेश होतो. कंपनी आंतरराष्ट्रीय ग्राहकांना ऑईल अँड गॅस, पेट्रोकेमिकल्स, पाणी, ड्रेजिंग आणि फर्टिलायझर्सची सर्व्हिस देते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT