Megatherm Induction sets IPO price band at Rs 100-108 per share  Sakal
Share Market

Megatherm Induction IPO: 25 जानेवारीला खुला होणार मेगाथर्म इंडक्शनचा आयपीओ; काय आहे प्राइस बँड?

Megatherm Induction IPO: मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मेगाथर्म इंडक्शनचा (Megatherm Induction) आयपीओ 25 जानेवारीला खुला होणार आहे. तर या आयपीओमध्ये 30 जानेवारीपर्यंत पैसे गुंतवले जाऊ शकतात. कंपनीने यासाठी 100-108 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे.

राहुल शेळके

Megatherm Induction IPO: मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मेगाथर्म इंडक्शनचा (Megatherm Induction) आयपीओ 25 जानेवारीला खुला होणार आहे. तर या आयपीओमध्ये 30 जानेवारीपर्यंत पैसे गुंतवले जाऊ शकतात. कंपनीने यासाठी 100-108 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे.

तर बोलीसाठी किमान लॉट साइज 1200 शेअर्सची आहे. आयपीओमध्ये पूर्णपणे 49.92 लाख नवीन शेअर्स विकले जातील असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मेगाथर्म इंडक्शनची आयपीओच्या अप्पर प्राइस बँडमध्ये सुमारे 53.91 कोटी उभारण्याची योजना आहे. मेगाथर्म इंडक्शन ही मेगाथर्म इलेक्ट्रॉनिक्सची उपकंपनी आहे.

आयपीओ बंद झाल्यानंतर, शेअर्स एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले जातील. आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर हेम सिक्युरिटीज लिमिटेड आहेत, तर रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत.

कंपनी आयपीओमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर फॅक्टरी शेड आणि अतिरिक्त प्लांट आणि मशिनरी बांधण्यासाठी वापरेल, शिवाय खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठीही वापरला जाईल.

मेगाथर्म अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम इक्विपमेंट, ट्रान्सफॉर्मर्स सारखे इंडक्शन स्टीलवर्क, ट्रांसफॉर्मर्स, कंटीन्युअस कास्टिंग मशीन, फ्यूम एक्स्ट्रक्शन सिस्टम इ. आणि अलॉय आणि स्पेशल स्टील इंडस्ट्रीसाठी इलेक्ट्रिक आर्क फर्नेसच्या निर्मितीच्या व्यवसायातही आहे.

आयपीओमधील 50 टक्के क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी 35 टक्के रिटेल इनवेस्टर्ससाठी आणि 15 टक्के नॉन इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्ससाठी राखीव आहेत. शेषाद्री भूषण चंदा, सताद्री चंदा आणि मेगाथर्म इलेक्ट्रॉनिक्स हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. सध्या मेगाथर्म इंडक्शनमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 98.92% आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT