MRF shares Sakal
Share Market

MRF Share: MRF कंपनीने रचला इतिहास, आता 1 शेअर खरेदी करण्यासाठी घ्यावं लागणार कर्ज!

MRF स्टॉकने शेअर बाजारात एक नवीन मैलाचा दगड स्थापित केला आहे.

राहुल शेळके

MRF Share: टायर निर्माता कंपनी एमआरएफ (MRF) च्या शेअर्सने मंगळवारी नवा इतिहास रचला आहे. कंपनीच्या शेअरच्या किंमतीने मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला.

अशाप्रकारे 1 लाख रुपयांचा टप्पा पार करणारा तो दलाल स्ट्रीटचा पहिला स्टॉक ठरला आहे. आज सकाळी बीएसईवर एमआरएफच्या शेअरची किंमत 1.37 टक्क्यांच्या तेजीसह 1,00,300 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. यासह स्टॉकने शेअर बाजारात एक नवीन मैलाचा दगड स्थापित केला आहे.

भारतातील सर्वात महाग स्टॉक:

MRF स्टॉक हा भारतातील सर्वात महाग स्टॉक आहे. या यादीत हनीवेल ऑटोमेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे या कंपनीच्या शेअरची किंमत 41,152 रुपये आहे. यानंतर पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, 3एम इंडिया, नेस्ले इंडिया आणि बॉशचे स्टॉक आहेत.

यामुळे एमआरएफ शेअरची किंमत जास्त:

स्टॉक स्प्लिटमुळे कोणत्याही स्टॉकची किंमत कमी होऊ शकते परंतु एमआरएफने आतापर्यंत असे केले नाही. चेन्नईस्थित कंपनीचे एकूण 42,41,143 शेअर्स आहेत. यापैकी 30,60,312 शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत.

अशाप्रकारे, कंपनीचे 72.16 टक्के हिस्सेदारी सार्वजनिक भागधारकांकडे आहे. त्याच वेळी, प्रवर्तकांकडे 11,80,831 शेअर्स आहेत, जे एकूण इक्विटी शेअर्सच्या 27.84 टक्के इतके आहे. गेल्या तीन महिन्यांत या शेअरच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जर तुम्ही एमआरएफच्या स्टॉकवर नजर टाकली तर 2010 मध्ये शेअरची किंमत 1,000 रुपये होती. 21 फेब्रुवारी 2012 रोजी स्टॉक 10,000 रुपयांवर पोहोचला. हा स्टॉक 20 जानेवारी 2021 रोजी 90,000 च्या वर बंद झाला.

यानंतर सुमारे अडीच वर्षांनी म्हणजेच आज 13 जून रोजी एमआरएफ स्टॉकने 1 लाख रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक ओलांडला आहे. 23 वर्षांत, MRF स्टॉकने सुमारे 10,000% परतावा दिला आहे.

MRF चे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. या कंपनीने 1946 मध्ये खेळण्यांचे फुगे बनवून सुरुवात केली. एमआरएफने 1960 पासून टायर्सचे उत्पादन सुरू केले. आज ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टायर निर्मिती कंपनी आहे. कंपनी 60 हून अधिक देशांमध्ये पोहोचली आहे.

MRF चे इतर व्यवसाय:

टायर निर्माता MRF चे मुख्यालय चेन्नई येथे आहे. टायर्स व्यतिरिक्त ते ट्यूब, कन्व्हेयर बेल्ट, पेंट्स, खेळणी बनवण्याचे काम करते. MRF ही जगातील सर्वात मोठी AAA ब्रँड ग्रेड टायर बनवणारी दुसरी टायर कंपनी आहे.

अनेक मोठे स्टार खेळाडू एमआरएफशी संबंधित:

एमआरएफच्या जाहिरातींमध्ये दिसणार्‍यांमध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, स्टीव्ह वॉ यांसारखे दिग्गज कंपनीचे चेहरे आहेत. सध्या विराट कोहली कंपनीचा चेहरा आहे. कंपनीने रोहित शर्मा, गौतम गंभीर या खेळाडूंनाही जाहिरातींमध्ये घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT