Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stock: 3 वर्षात 1,690 टक्के परतावा, कंपनीने केली स्टॉक स्प्लिटची घोषणा, कोणता आहे 'हा' शेअर?

Multibagger Stock : कंपनीचे मार्केट कॅप 854.42 कोटी आहे.

शिल्पा गुजर

Multibagger Stock: शेअर बाजारात चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला अतिशय दमदार परतावा मिळतो. अशात तुम्ही चांगला मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही इएफसी लिमिटेडच्या (EFC LTD) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.

त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अतिशय कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा दिला आहे. याशिवाय इएफसी लिमिटेडने त्यांच्या लेटेस्ट एक्सचेंज फायलिंगमध्ये 1:5 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहे.

नुकतीच कंपनीच्या शेअर्समध्ये 4.29 टक्क्यांची मजबूत वाढ दिसून आली आणि शेअर 1,105.70 रुपयांवर बंद झाला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 854.42 कोटी आहे.

कंपनीने 5 ऑगस्ट 2023 रोजी बोर्डाची बैठक घेतली, ज्यात त्यांनी त्यांचे शेअर्स स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, 10 रुपये फेस व्हॅल्यू असणारा शेअर प्रत्येकी 2 रुपये फेस व्हॅल्यूच्या 5 नवीन शेअर्समध्ये विभागला जाईल. कंपनीने यासाठी 18 ऑगस्ट 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

इएफसी लिमिटेडने 5 ऑगस्टला जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळणारा महसूल वार्षिक 14005% वाढला आहे. तो आता 56.42 कोटींवर गेला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा 29.13 कोटीपर्यंत वाढला असून 51.63 टक्के ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे.

कंपनीचा निव्वळ नफा 1120 टक्क्यांनी वाढून 3.18 कोटी झाला आहे. कंपनीचा कॅपिटल एम्प्लॉइड ऑन रिटर्न (ROCE) 11 टक्के आणि रिटर्न ऑन इक्विटी (ROE) 10.5 टक्के आहे.

इएफसी लिमिटेडने गेल्या एका महिन्यात 30% परतावा दिला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 6 महिन्यांत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 228 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात याने तब्बल 650% परतावा दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या 3 वर्षात त्यांनी गुंतवणूकदारांना 1690% परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT